भारताच्या क्रिकेटपटूचा संघ स्पॉट फिक्सिंगमध्ये, प्रशिक्षकासह फलंदाजाला अटक

केपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकऱणी आणखी दोघांना अटक कऱण्यात आली आहे. यामध्ये भारतीय संघातून खेळलेला क्रिकेटपटू नेतृत्व करत असलेल्या संघातील खेळाडूला अटक झाली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 12:23 PM IST

भारताच्या क्रिकेटपटूचा संघ स्पॉट फिक्सिंगमध्ये, प्रशिक्षकासह फलंदाजाला अटक

नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : भारतीय संघातील अनेक खेळाडू ज्या लीगमध्ये खेळले त्या कर्नाटक प्रीमीयर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंगचे प्रकरण समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. यात अनेक दिग्गज खेळाडू अडकले आहेत. आयपीएलच्या धर्तीवर कर्नाटकात केपीएल सुरू करण्यात आली. त्याची चर्चा स्पॉट फिक्सिंगमुळे जास्त झाली. यामध्ये आता दोघांना अटक कऱण्यात आलं आहे. हुबळी टायगर्सचा यष्टीरक्षक फलंदाज एम विश्वनाथन आणि बेंगळुरू ब्लास्टर्सचा गोलंदाजी प्रशिक्षक विनू प्रसाद यांना 2018 च्या केपीएलमध्ये सट्टेबाजीत सहभाग घेतल्याबद्दल बेंगळुरू क्राइम ब्रँचने अटक केली आहे.

2008 च्या हंगामात कर्नाटक कडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या विनू प्रसाद याच्यावर सट्टेबाजीत भाग घेतल्याचा आरोप आहे. तसेच 39 वर्षीय विश्ननाथन गेल्या 20 वर्षांपासून क्लब सर्किटमध्ये सक्रिय आहे. दोघांवर 2018 च्या बेंगळुरू ब्लास्टर्स आणि बेळगावी पँथर्स यांच्या झालेल्या सामन्यात स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप आहे.

गेल्या हंगामात विश्वनाथन ब्लास्टर्सकडून खेळला होता. त्याच्या संघाचे नेतृत्व रॉबिन उथप्पा करत होता. विश्वनाथनने खराब कामगिरी करण्यासाठी बुकींकडून 5 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. यात त्याने पैसे घेऊन सामन्यात धीम्या गतीने फलंदाजी केली असे म्हटले होते. मात्र, धावफलक पाहता त्याने 26 चेंडूत 46 धावा केल्या होत्या आणि संघाने 67 धावांनी विजय मिळवला होता.

संघाची चौकशी सध्या पोलिस करत आहे. सह पोलिस आयुक्त संदीप पाटील यांनी सांगितले की, या प्रकऱणात आणखी काही बुकींना अटक करण्यात आली आहे. मात्र विनू प्रसादच्या भूमिकेबद्दल जास्त माहिती दिली नाही. विनू खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील अटक करण्यात आलेला पहिला व्यक्ती आहे. याआधी क्राइम ब्रँचने बेळगावी पँथर्सचे मालक अली अशफाक आणि ड्रमर भावनेश बाफनाला ताब्यात घेतलं होतं.

video: ... तर सचिन कधी क्रिकेट खेळू शकला नसता; स्वत: केला मोठा खुलासा!

Loading...

SPECIAL REPORT: सत्तेसाठी पक्षांतर करणाऱ्या 'या' नेत्यांना मतदारांनी दाखवला घरचा रस्ता

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2019 12:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...