S M L

अर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी

अर्जुनने घेतलेला कमीलच्या बळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Updated On: Jul 18, 2018 04:06 PM IST

अर्जुन तेंडुलकरने घेतली विकेट, व्हिडिओ पाहून भावूक झाला विनोद कांबळी

मुंबई, 18 जुलैः अर्जुन तेंडुलकरने त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतला पहिला बळी श्रीलंकेविरुद्धात घेतला. सध्या अर्जुन भारताच्या १९ वर्षाखालील संघाकडून श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड करण्यात आली आहे. अर्जुनने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच सामन्यात श्रीलंकेच्या कामिल मिशाराला पायचीत केले. सध्या अर्जुनने घेतलेला कमीलच्या बळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...

अर्जुनचे सर्व स्थरांवरून कौतुक होत असताना सचिन तेंडुलकरचा जवळचा मित्र विनोद कांबळीने अर्जुनसाठी एक भावनीक ट्विटही केले आहे. विनोदने लिहिले की, जेव्हा मी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मी त्याला लहानाचं मोठं होताना पाहिलं आहे. त्याने किती मेहनत घेतली आहे हे मी स्वतः पाहिले आहे. आज मी तुझ्यासाठी फार आनंदी आहे. अर्जुन ही फक्त तुझी सुरूवात आहे. तुला अजून खूप पुढे जायचं आहे. खूप यश संपादन करायचं आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील तुझ्या पहिल्या बळीचा आनंद एन्जॉय कर.

हेही वाचाः

छगन भुजबळांना शिवीगाळ करणारा पोलीस निरीक्षक निलंबित

अजब मनपाचा गजब दावा, प्लास्टिक बंदीमुळे मुंबईत कमी पाणी तुंबलं

भाजपविरोधात आंदोलनामुळे मनसे कार्यकर्त्यांना थर्ड डिग्री, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 18, 2018 04:06 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close