भारताची कुस्तीपटू विनेश फोगटचं सलग तिसरं सुवर्ण!

भारताची कुस्तीपटू विनेश फोगटचं सलग तिसरं सुवर्ण!

भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटनं पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट : भारताची कुस्तीपटू विनेश फोगटनं पोलंड ओपन कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलोग्रॅम वजनी गटात सुवर्णपदक जिंकलं. या वजनी गटात तीचं सलग तिसरं सुवर्ण आहे. विनेश फोगटनं रुक्सानाला अंतिम सामन्यात 3-2 ने पराभूत केलं.

विनेश फोगटनं याआधी उपांत्यपूर्व सामन्यात रिओ ऑलिंपिकमधील कांस्यपदक विजेत्या स्वीडनच्या सोफिया मॅटसनला हरवलं होतं. विनेशनं गेल्या महिन्यात स्पेनमध्ये झालेल्या ग्रां प्री आणि तुर्कीत झालेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्ण पदके पटकावली होती.

सुवर्णपदक जिंकल्यानंतर विनेश फोगटनं ट्वीट केलं की, बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळताना आपला सर्वोत्तम खेळ होतो ही बाब सकारात्मक आहे. यातून मला अनेक गोष्टी शिकायला मिळतात. पोलंदमधील कामगिरीने आनंदी आहे. सध्या 53 किलोग्रॅम वजनी गटात खेळताना चांगलं वाटत असल्याचंही विनेश फोगट म्हणाली.

SPECIAL REPORT: भारतीय जवानांनी पाकचे दात घशात घातले, दहशतवाद्यांसह बॅटच्या 7 कमांडोंचा खात्मा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 11:11 AM IST

ताज्या बातम्या