आता होणार 'दंगल', विनेश फोगटनं मिळवले ऑलिम्पिकचे तिकिट!

आता होणार 'दंगल', विनेश फोगटनं मिळवले ऑलिम्पिकचे तिकिट!

53 किलो वजनी गटात विनेशनं World Wrestling Championship स्पर्धेत मिळवले ऑलिम्पिकचे तिकीट.

  • Share this:

नुर सुल्‍तान, 18 सप्टेंबर : भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत (World Wrestling Championship) अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटचा पराभव करत टोकियोमध्यो होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले आहे. अशी कामगिरी करणारी विनेश फोगट पहिली कुस्तीपटू बनली आहे. 53 किलो वजनी गटात विनेशनं ही कामगिरी केली आहे.

जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत (World Wrestling Championship) विनेशनं दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या साराला 8-2नं पराभूत करत कांस्य पदाकासाठी क्वालिफाय झाली आहे. दरम्यान विनेशला कांस्यपदकासाठी ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीशी सामना करायचा आहे. त्यामुळं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आपले पहिले पदक मिळवण्यासाठी विनेश केवळ एक पाऊल दूर आहे. विनेशनं पराभव केलेली सारा ही गतवर्षी 53 किलो वजनी गटात तिनं रौप्य पदक जिंकले होते. या स्पर्धेत विनेश 50 आणि 53 किलो वजनी गटात सहभागी झाली आहे.

याआधी विनेशनं आपल्या पहिल्या सामन्यात विनेशने युक्रेनच्या युलियावर 5-0नं सहज मात दिली. विनेशनं या स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे. दुसरीकडे भारताच्या सीमा बिसलानेही पहिल्या फेऱ्यांमध्ये आश्वासक खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी सीमा दुसऱ्या फेरीत पराभूत झाली.

याव्यतिरीक्त भारताची पुजा धांडाही या स्पर्धेत 59 किलो वजनी गटात आपलं ऑलिम्पिक स्थान पक्क करण्यासाठी उतरली आहे.जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेनंतर विनेशचे लक्ष टोकियोमध्ये 2020मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले सुवर्ण जिंकण्यावर असणार आहे. त्यासाठी या स्पर्धेनंतर विनेशच्या ऑलिम्पिक तयारीला सुरुवात होणार आहे.

अपघातात फोटो काढणाऱ्या तरुणाला बोनटवर घेऊन पळाला आरोपी, पाहा VIRAL VIDEO

Published by: Priyanka Gawde
First published: September 18, 2019, 3:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading