फक्त 13 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला 'हा' खेळाडू झाला टीम इंडियाचा बॅटिंग कोच!

फक्त 13 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला 'हा' खेळाडू झाला टीम इंडियाचा बॅटिंग कोच!

गुरुवारी बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सपोर्ट स्टाफच्या नावाची घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड झाल्यानंतर आता सपोर्ट स्टाफची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी सपोर्ट स्टाफच्या नावाची घोषणा केली आहे. निवड समितीनं फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर यांच्याऐवजी विक्रम राठोड यांच्या नावाला पहिली पसंती दिली आहे. दुसऱ्या स्थानी संजय बांगर असून तिसऱ्या स्थानी इंग्लंडचे मार्क रामप्रकाश आहेत. अंतिम निर्णय बीसीसीआय घेणार आहे.

एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या संघानं गोलंदाजी कोच म्हणून भरत अरूण आणि फिल्डिंग कोच म्हणून आर. श्रीधर यांचे पद कायम ठेवले आहे. प्रसाद यांनी सपोर्ट स्टाफसाठी टॉप-3 नावे घोषित केले. फलंदाजी कोचसाठी पहिल्या क्रमांकावर विक्रम राठोड, दुसऱ्या स्थानावर संजय बांगर आणि तिसऱ्या स्थानावर मार्क रामप्रकार आहेत. बॅटिंग कोचच्या पदासाठी इंग्लंडचा माजी फलंदाज जोनाथन ट्रॉट, मार्क रामप्रकाश, अमोल मुझूमदार, ऋषिकेश काणेटकर, प्रवीण आम्रे, लालचंद राजपूत, तिलन समरावीरा आणि विक्रम राठोड यांनी अर्ज केले होते. दरम्यान यातील विक्रम राठोड यांचे नाव बॅटिंग कोच म्हणून निश्चित झाले आहे.

वाचा-न्यूझीलंडला फायनलपर्यंत पोहचवणारा प्रशिक्षक आता विराटला जिंकून देणार IPL!

कोण आहेत विक्रम राठोड

विक्रम राठोड भारताचे सलामीचे फलंदाज होते. त्यांनी भारतासाठी 6 कसोटी आणि 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. भारतीय संघात खेळण्याचा जास्त अनुभव नसला तरी, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम यांनी चांगली कामगिरी केली आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या विक्रम यांनी 50च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. दरम्यान 2012मध्ये भारतीय संघाच्या निवड समितीवरही होते.

वाचा-'फक्त शतक करण्यासाठी खेळायला मी स्वार्थी नाही', रहाणेच्या उत्तराची चर्चा

राहुल द्रविड सोबत विक्रम यांचे संबंध चांगले

नॅशनल क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याला विक्रमच्या क्षमेतवर पूर्ण विश्वास आहे. याच वर्षी विक्रम यांची भारत ए संघाच्या बॅटिंग कोचसाठी निवड झाली होती, यासाठी द्रविडनं त्यांची शिफारस केली होती. त्यामुळं टीम इंडियाचा बॅटिंग कोचपदासाठी राहुल द्रविड यांनी विक्रम यांची शिफारस केली असावी अशा चर्चा आहेत.

वाचा-टीम इंडियाच्या 'या' प्रशिक्षकाला नारळ, निवड समितीनं बीसीसीआयकडे केली शिफारस

सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना; उद्धव ठाकरे म्हणतात....

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: team india
First Published: Aug 23, 2019 04:30 PM IST

ताज्या बातम्या