News18 Lokmat

विजेंदरने चिनी बाॅक्सरला लोळवलं, चीनला दिला शांततेचा संदेश

भारताचा बाॅक्सिंग स्टार विजेंदर सिंगने चीनचा बाॅक्सर जुल्पिकार मैमतअलीची धुलाई करत दणदणीत विजय मिळवलाय.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2017 11:55 PM IST

विजेंदरने चिनी बाॅक्सरला लोळवलं, चीनला दिला शांततेचा संदेश

05 आॅगस्ट : भारताचा बाॅक्सिंग स्टार विजेंदर सिंगने चीनचा बाॅक्सर  जुल्पिकार मैमतअलीची धुलाई करत दणदणीत विजय मिळवलाय. या विजयासह विजेंदरने चीनला सीमारेषेवर शांततेचा संदेशही दिला. विजेंदरने 96-93, 95-94, 95-94 असा सामना जिंकला.

या विजयासह विजेंदरने डब्ल्युबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेटचा खिताब कायम ठेवलाय. या सोबतच  WBO ओरिएंटल सुपर मिडलवेट टाइटलचा खिताबही जिंकलाय. विजेंदर WBO आशिया पॅसिफिक मिडलवेट चॅम्पियन पहिल्यापासून होता.

विजेंदरला प्रो बाॅक्सर होण्यासाठी चांगलीच झुंज द्यावी लागली. चीन बाॅक्सर मैमतअलीने विजेंदरच्या पोटावर निशाणा साधला होता. त्यामुळे विजेंदर चांगलीच अडचण आली होती. पण विजेंदरने जोरदार पंच लगावत चीन बाॅक्सरचा धुव्वा उडवला.

विजेंदरच्या अगोदर अखिल कुमार आणि जितेंदर कुमारने विजय मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 5, 2017 11:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...