‘हे क्रिकेट आहे बॉलीवूड नाही’, सलमान स्टाइल फोटोमुळे टीम इंडियाचा स्टार खेळाडू झाला ट्रोल

‘हे क्रिकेट आहे बॉलीवूड नाही’, सलमान स्टाइल फोटोमुळे टीम इंडियाचा स्टार खेळाडू झाला ट्रोल

टीम इंडियाच्या स्टार खेळाडूनं अपलोड केला शर्टलेस फोटो आणि सोशल मीडियावर झाला ट्रोल.

  • Share this:

मुंबई, 16 ऑक्टोबर : सध्या युवा खेळाडू हे आपल्या खेळापेक्षा जास्त स्टाइलवर लक्ष देतात, असे आरोप अनेक वेळा खेळाडूंवर होते. दरम्यान असा प्रकार सध्या सर्रास दिसत आहे. मग तो हार्दिक पांड्या असो किंवा केएल राहुल. आपल्या खेळापेक्षा जास्त स्टाइलमुळे त्यांची जास्त चर्चा होते. असाच एक युवा खेळाडू स्टाइल मारायला गेला, मात्र चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकर क्रिकेटपासूल लांब आहे. वर्ल्ड कपमध्ये विजय शंकर दुखापतीमुळं बाहेर पडला आणि त्यानंतर त्याला टीम इंडियात जागा मिळाली नाही. मात्र आता त्यानं अपलोड केलेल्या शर्टलेस फोटोमुळं विजय शंकर सध्या ट्विटरवर ट्रोल होत आहे.

विजय शंकरनं आपल्या ट्विटरवर सिक्स पॅक असलेल्या शर्टलेस फोटो टाकला. यावर विजय शंकरनं ट्रान्सफॉरमेशन केलेल्या बॉडीचा फोटो टाकला आहे.

यावर चाहत्यांनी हे बॉलीवूड नाही क्रिकेट आहे, पासून कपडे काढायला जेवढी मेहनत घेतली तेवढी खेळण्यासाठी घेतली असती तर?, असे ट्रोल केले आहे.

दरम्यान, विजय शंकर सध्या विजय हजारे करंकड स्पर्धेत खेळत आहे. त्यामुळं टी-20 वर्ल्ड कपमध्ये विजय शंकरला संघात जागा मिळेल की नाही, हे पाहावे लागणार आहे.

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 05:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading