मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट कोहलीचा फेवरेट खेळाडू झाला फिट, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होणार निवड!

विराट कोहलीचा फेवरेट खेळाडू झाला फिट, दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होणार निवड!

भारतातली स्थानिक वनडे स्पर्धा असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy) तामिळनाडूच्या (Tamil Nadu) टीमची घोषणा करण्यात आली आहे. 20 सदस्यांच्या या टीममध्ये अनुभवी विकेट कीपर दिनेश कार्तिक आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याची निवड करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

चेन्नई, 23 नोव्हेंबर : भारतातली स्थानिक वनडे स्पर्धा असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy) तामिळनाडूच्या (Tamil Nadu) टीमची घोषणा करण्यात आली आहे. 20 सदस्यांच्या या टीममध्ये अनुभवी विकेट कीपर दिनेश कार्तिक आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) याची निवड करण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदर हा विराट कोहलीच्या (Virat Kohli) आवडत्या खेळाडूपैकी एक आहे. दिनेश कार्तिक दुखापतीमुळे सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये खेळू शकला नव्हता. या स्पर्धेत तामिळनाडूने अखेरच्या बॉलवर कर्नाटकवर रोमांचक विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदर इंग्लंड दौऱ्यापासूनच दुखापतीमुळे टीमबाहेर होता. बँगलोरच्या एनसीएमध्ये त्याचं रिहॅबिलिटेशन करण्यात आलं.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये तामिळनाडूला एलीट ग्रुप बीमध्ये ठेवण्यात आलं आहे. टीम सुरुवातीचे आपले सामने तिरुवनंतपूरममध्ये खेळणार आहे. 8 डिसेंबरला तामिळनाडूचा पहिला सामना मुंबईविरुद्ध होणार आहे. ऑलराऊंडर विजय शंकर तामिळनाडूचा कर्णधार असेल. तर उपकर्णधार एन जगदीशनला उपकर्णधार करण्यात आलं आहे. विजय शंकरच्याच नेतृत्वात तामिळनाडूने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये विजय मिळवला होता.

टीम इंडिया डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. टीम तिकडे टेस्ट, वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये वॉशिंग्टन सुंदरने चांगली कामगिरी केली तर त्याची टीम इंडियात निवड होईल. दुखापतीमुळे सुंदर टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नव्हता.

आयपीएल 2022 च्या लिलावाआधी सुंदर फॉर्ममध्ये यायचा प्रयत्न करेल. टी-20 फॉरमॅटमधली सुंदरची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. 98 टी-20 सामन्यांमध्ये 29 च्या सरासरीने त्याने 74 विकेट घेतल्या आहेत. त्याचा इकोनॉमी रेटही 6.76 चा आहे. याशिवाय त्याने 21 च्या सरासरीने 866 रनही केल्या आहेत, यात 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

First published: