Home /News /sport /

2 मॅच 183 रन आणि 5 विकेट, रोहितची चिंता मिटली, टीम इंडियाला मिळाला हार्दिकचा पर्याय

2 मॅच 183 रन आणि 5 विकेट, रोहितची चिंता मिटली, टीम इंडियाला मिळाला हार्दिकचा पर्याय

व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) विजय हजारे ट्रॉफीमध्ये ( Vijay Hazare Trophy) धमाकेदार कामगिरी करत आहे. शनिवारी उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात मध्य प्रदेशकडून खेळताना (Madhya Pradesh vs Uttarakhand) त्याने अर्धशतक केलं आणि 2 विकेटही घेतल्या.

पुढे वाचा ...
    राजकोट, 11 डिसेंबर : व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) विजय हजारे ट्रॉफीमध्ये ( Vijay Hazare Trophy) धमाकेदार कामगिरी करत आहे. शनिवारी उत्तराखंडविरुद्धच्या सामन्यात मध्य प्रदेशकडून खेळताना (Madhya Pradesh vs Uttarakhand) त्याने अर्धशतक केलं आणि 2 विकेटही घेतल्या. स्पर्धेच्या मागच्या दोन सामन्यांमध्ये अय्यरने एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 183 रन केल्या आहेत, याशिवाय त्याने 5 विकेटही घेतल्या. टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) सध्या दुखापतीमुळे टीमबाहेर आहे, त्यामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी (India vs South Africa) अय्यरची वनडे टीममध्ये निवड होऊ शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 वनडे मॅचची सीरिज खेळणार आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या या सामन्यात मध्य प्रदेशने पहिले बॅटिंग करत 7 विकेट गमावून 330 रन केले. पाचव्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या व्यंकटेश अय्यरने 49 बॉलमध्ये आक्रमक 71 रन केले, यामध्ये 3 फोर आणि 4 सिक्सचा समावेश होता. याशिवाय ओपनर अभिषेक भंडारीने 106 आणि शुभम शर्माने 70 रन केले. या आव्हानाचा पाठलाग करताना उत्तराखंडला 9 विकेट गमावून 253 रनच करता आले, त्यामुळे मध्य प्रदेशने हा सामना 77 रनने जिंकला. व्यंकटेश अय्यरने या सामन्यात 10 ओव्हरमध्ये 58 रन देऊन 2 विकेट घेतल्या. याशिवाय पुनित दातेनेही 3 विकेट पटकावल्या. त्याआधी व्यंकटेश अय्यरने केरळविरुद्ध 84 बॉलमध्येच 112 रन केले होते. या शतकी खेळीमध्ये त्याने 7 फोर आणि 4 सिक्स मारले होते. तसंच बॉलिंगमध्ये त्याने 9 ओव्हरमध्ये 55 रन देऊन 3 विकेट मिळवल्या. महाराष्ट्राविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अय्यरने 14 रन केले आणि एक विकेटही घेतली. केकेआरने (KKR) आयपीएल 2022 (IPL 2022) साठी व्यंकटेश अय्यरला 8 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. आयपीएल 2021 मध्ये अय्यरने उत्कृष्ट कामगिरी केली होती, याच मोसमात तो पहिल्यांदा आयपीएल खेळला. 10 मॅचमध्ये त्याने 370 रन केले आणि 3 विकेट मिळवल्या. आयपीएलमधल्या या कामगिरीमुळे अय्यरची न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सीरिजसाठीही (India vs New Zealand) टीम इंडियात निवड झाली. आता दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीही त्याची निवड निश्चित मानली जात आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या