Vijay Hazare Trophy : KKR च्या 20 लाखांच्या खेळाडूने दाखवला ट्रेलर, फोर-सिक्सचा पाऊस

Vijay Hazare Trophy : KKR च्या 20 लाखांच्या खेळाडूने दाखवला ट्रेलर, फोर-सिक्सचा पाऊस

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) बॅट्समनच्या वादळी खेळी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. काहीच दिवसांपूर्वी मुंबईकर पृथ्वी शॉ याने धडाकेबाज द्विशतक केलं होतं. आता 26 वर्षांचा युवा खेळाडू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याचं द्विशतक फक्त 2 रननी हुकलं. अय्यरचा हा करियरमधला सर्वाधिक स्कोअर आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) बॅट्समनच्या वादळी खेळी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. काहीच दिवसांपूर्वी मुंबईकर पृथ्वी शॉ याने धडाकेबाज द्विशतक केलं होतं. आता शनिवारी इंदूरच्या होळकर स्टेडियममध्येही असाच धमाका पाहायला मिळाला. 26 वर्षांचा युवा खेळाडू वेंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) याचं द्विशतक फक्त 2 रननी हुकलं. अय्यरचा हा करियरमधला सर्वाधिक स्कोअर आहे.

पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये मध्य प्रदेशने (Punjab vs Madhya Pradesh) टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर अय्यर ओपनिंगला अभिषेक भंडारीसोबत आला. वेंकटेशने सुरुवातीपासूनच जलद रन करायला सुरूवात केली. 21 रन करणाऱ्या अभिषेकसोबत त्याने 68 रन जोडले. तर रजत पाटीदारसोबत पार्टनरशीप करत मध्यप्रदेशचा स्कोअर 204 पर्यंत पोहोचवला. रजतने 59 बॉलमध्ये तीन फोर आणि एक सिक्स मारत 54 रन केले. पण दुसरीकडून अय्यर किल्ला लढवत होता. 146 बॉलमध्ये 198 रन करून वेंकटेश अय्यर आऊट झाला. त्याच्या या खेळीमध्ये 20 फोर आणि 7 सिक्सचा समावेश होता. मध्य प्रदेशचा स्कोअर 353 असताना वेंकटेश माघारी परतला.

अय्यरची विकेट गेल्यानंतर त्याच्यासोबत 149 रनची पार्टनरशीप करणाऱ्या आदित्य श्रीवास्तवने इनिंग हातात घेतली. मध्य प्रदेशने 50 ओव्हरमध्ये तीन विकेट गमावून 402 रन केले. आदित्य 88 रनवर नाबाद राहिला. या इनिंगमध्ये त्याने 8 फोर आणि 4 सिक्स मारले. तर कर्णधार पार्थ सहानीने नाबाद 28 रन केले.

आयपीएलच्या (IPL_ लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने अय्यरला 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं. त्याच्या या खेळीमुळे केकेआरच्या (KKR) अपेक्षा नक्कीच वाढल्या असतील.

Published by: Shreyas
First published: February 28, 2021, 7:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या