मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /युवराजच्या वाढदिवशी भारताला मिळाला नवा सिक्सर किंग, 10 सिक्स ठोकत केले 151 रन!

युवराजच्या वाढदिवशी भारताला मिळाला नवा सिक्सर किंग, 10 सिक्स ठोकत केले 151 रन!

टीम इंडिया या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) जाणार आहे, त्याआधी विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि मध्य प्रदेशचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 12 डिसेंबर : टीम इंडिया या आठवड्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India tour of South Africa) जाणार आहे. दोन्ही देशांमध्ये पहिले 3 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. यानंतर 3 वनडे मॅचची सीरिज खेळवली जाईल. वनडे सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा अजूनही झालेली नाही. निवड समितीसाठी टीम जाहीर करणं सोपं असणार नाही, कारण विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) अनेक खेळाडूंनी धमाकेदार कामगिरी केली आहे. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि मध्य प्रदेशचा ऑलराऊंडर व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

हे दोन्ही खेळाडू भारताकडून टी-20 खेळले आहेत, पण अजूनही त्यांना वनडे खेळण्याची संधी मिळाली नाही. हे दोघंही सध्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) झालेल्या दुखापतीमुळे व्यंकटेश अय्यरला संधी मिळणं जवळपास निश्चित आहे. हार्दिकच्या अनुपस्थितीमध्ये भारताला व्यंकटेश अय्यरच्या रुपात फिनिशर आणि फास्ट बॉलिंग ऑलराऊंडरचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

व्यंकटेश अय्यरने ठोकले 151 रन

व्यंकटेश अय्यरने रविवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये चंडीगडविरुद्धच्या सामन्यात शानदार 151 रन केले. मध्य प्रदेशने 13.4 ओव्हरमध्ये 56 रनवर 4 विकेट गमावल्या होत्या. व्यंकटेश अय्यर सहाव्या क्रमांकावर बॅटिंगला आला आणि चंडीगडच्या बॉलिंगवर आक्रमण केलं. त्याने 88 बॉलमध्ये 7 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने शतक पूर्ण केलं. 113 बॉलमध्ये 151 रन करून अय्यर आऊट झाला. व्यंकटेशने या इनिंगमध्ये 8 फोर आणि 10 सिक्स मारल्या, त्याच्या या खेळीमुळे मध्य प्रदेशने चंडीगडला विजयासाठी 331 रनचं आव्हान दिलं.

व्यंकटेशची 2 शतकं आणि एक अर्धशतक

विजय हजारे ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात व्यंकटेश अय्यरचं हे दुसरं शतक आहे. याआधी त्याने केरळविरुद्ध 9 डिसेंबरला 84 बॉलमध्ये 112 रन केले. तेव्हा तो चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आला होता. याशिवाय त्याने बॉलिंगमध्येही कमाल केली होती. अय्यरने त्या मॅचमध्ये 3 विकेट घेतल्या होत्या. एक दिवस आधी उत्तराखंडविरुद्ध त्याने 71 रनची खेळी केली आणि 2 विकेटही मिळवल्या. म्हणजेच त्याने स्पर्धेत बॅटिंगसह बॉलिंगमध्येही कमाल केली आहे. आतापर्यंत अय्यरने 4 इनिंगमध्ये 139 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 348 रन केले, यामध्ये 2 शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे.

First published:
top videos