Home /News /sport /

Vijay Hazare Trophy : पुणेकर यशवर भारी पडला मुंबईकर श्रेयस!

Vijay Hazare Trophy : पुणेकर यशवर भारी पडला मुंबईकर श्रेयस!

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) मुंबईने महाराष्ट्राचा (Mumbai vs Maharashtra) 6 विकेटने पराभव केला आहे. कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) च्या शतकामुळे मुंबईने महाराष्ट्रावर (Mumbai vs Maharashtra) विजय मिळवला.

    जयपूर, 23 फेब्रुवारी : विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) मुंबईने महाराष्ट्राचा (Mumbai vs Maharashtra) 6 विकेटने पराभव केला आहे. महाराष्ट्राने ठेवेलेलं 280 रनचं आव्हान मुंबईने 47.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने 99 बॉलमध्ये नाबाद 103 रन केले, तर यशस्वी जयस्वालने 40, पृथ्वी शॉ 34, सूर्यकुमार यादव 29, शिवम दुबे 47 आणि सरफराज खानने नाबाद 15 रन केले. महाराष्ट्राकडून सत्यजीत बच्छावने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या, तर अझीम काजीला एक विकट मिळाली. या मॅचमध्ये महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर ओपनर यश नाहरने 119 रनची तर अझीम काजीने 104 रनची खेळी केली. मुंबईकडून धवल कुलकर्णीने 5 विकेट घेतल्या, तर शार्दुल ठाकूर आणि तुषार देशपांडेला प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली. विजय हजारे ट्रॉफीच्या एलीट ग्रुप डीमध्ये असलेल्या मुंबईचा दोन मॅचमधला हा दुसरा विजय आहे. याआधी दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्येही मुंबईचा 7 विकेटने विजय झाला होता. दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये पृथ्वी शॉने 89 बॉलमध्ये 105 रन केले होते, तर सूर्यकुमार यादवनेही अर्धशतक केलं होतं. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर मुंबईच्या टीमवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईने कामगिरी सुधारली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या