मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Vijay Hazare Trophy : आधी टीम इंडियानं नाकारलं; आता लगावले विराट, रोहितपेक्षा जलद द्विशतक

Vijay Hazare Trophy : आधी टीम इंडियानं नाकारलं; आता लगावले विराट, रोहितपेक्षा जलद द्विशतक

युवा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसननं विजय हजारे चषक स्पर्धेत वादळी खेळी केली आहे.

युवा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसननं विजय हजारे चषक स्पर्धेत वादळी खेळी केली आहे.

युवा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसननं विजय हजारे चषक स्पर्धेत वादळी खेळी केली आहे.

  • Published by:  Priyanka Gawde

अलुर, 12 ऑक्टोबर : युवा विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसननं विजय हजारे चषक स्पर्धेत वादळी खेळी केली आहे. भारतात होणाऱ्य़ा विजय हजारे करंडक स्पर्धेत केरळ संघाकडून फलंदाजी करणाऱ्या संजूनं यंदाच्या स्पर्धेतील पहिले द्विशतक लगावले आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजूनं भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामन्यात विराट आणि रोहितनं लगावलेल्य़ा द्विशतकापेक्षा जलद ही कामगिरी केली आहे.

केरळसाठी खेळणाऱ्या 24 वर्षीय विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसननं गोवा विरोधात झालेल्या सामन्यात केवळ 125 चेंडूत चौकार आणि षटाकारांची आतषबाजी करत वादळी द्विशतक केले. याआधी कोणत्याच भारतीय खेळाडूनं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एवढ्या जलद दुहेरी शतक लगावलेले नाही. भारताकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमधले हे आठवे दुहेरी शतक आहे.

संजू सॅमसनची वादळी खेळी

उजव्या हाताचा फलंदाज संजू सॅमसननं 129 चेंडूत 21 चौकार आणि 10 षटकार लगावत 212 धावांची खेळी केली. संजू सॅमसननं चक्क 164.34च्या स्ट्राईक रेटनं ही वादळी खेळी केली. संजूची प्रथम श्रेणी क्रिकेटमधले पहिले शतक आहे, ज्याचे रुपांतर दुहेरी शतकात केले. या शतकामुळं संजू सॅमसननं ऋषभ पंतच्या अडचणी वाढवल्या आहेत.

वाचा-चाहत्यांसाठी खुशखबर! निवृत्तीनंतरही तिसऱ्या कसोटी सामन्यात दिसणार धोनी

वाचा-32 कर्णधार करू शकले नाहीत अशी 'विराट' कामगिरी, तरीही कोहलीपुढं 'हे' आव्हान!

दुहेरी शतकासह सॅमसननं केले हे रेकॉर्ड

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताकडून सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, शिखर धवन, करनवीर कौशल आणि संजू सॅमसन यांनी दुहेरी शतक लगावले आहेत. सचिन तेंडुलकर, सेहवाग आणि रोहित यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही दुहेरी शतक लगावले आहे. दरम्यान संजूला आतापर्यंत टीम इंडियात स्थान मिळाले नाही आहे. संजूनं 2015मध्ये भारताकडून फक्त एकमेव टी-20 सामना खेळला होता. तर, 2013मध्ये त्यानं आयपीएलमध्ये पदार्पण केले. संजूनं भारताकडून खेळलेल्या एकमेव टी-20 सामन्यात 19 धावा केल्या होत्या.

वाचा-विराटने संघातून वगळलेल्या खेळाडूचं वेगवान शतक, चौकार-षटकारांची आतषबाजी

पंतप्रधान मोदींनी 30 मिनिटं केली समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, पाहा VIDEO

First published:

Tags: Sanju Samson