मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /4 शतकं, 603 रन आणि 70 बाऊंड्री, तरीही महाराष्ट्राचा ऋतुराज 'फेल'!

4 शतकं, 603 रन आणि 70 बाऊंड्री, तरीही महाराष्ट्राचा ऋतुराज 'फेल'!

ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad)  विजय हजारे ट्रॉफीमधला  (Vijay Hazare Trophy) प्रवास मंगळवारी संपला. ऋतुराजने ग्रुप राऊंडच्या अखेरच्या सामन्यात 168 रनची खेळी केली, त्यामुळे महाराष्ट्राने (Maharashtra) चंडीगडवर 5 विकेटने विजय मिळवला. या विजयानंतरही महाराष्ट्राची टीम स्पर्धेबाहेर गेली आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 14 डिसेंबर : ऋतुराज गायकवाडचा (Ruturaj Gaikwad)  विजय हजारे ट्रॉफीमधला  (Vijay Hazare Trophy) प्रवास मंगळवारी संपला. ऋतुराजने ग्रुप राऊंडच्या अखेरच्या सामन्यात 168 रनची खेळी केली, त्यामुळे महाराष्ट्राने (Maharashtra) चंडीगडवर 5 विकेटने विजय मिळवला. या विजयानंतरही महाराष्ट्राची टीम स्पर्धेबाहेर गेली आहे. तर केरळ आणि मध्य प्रदेशच्या टीम नॉकआऊट राऊंडमध्ये पोहोचल्या आहेत. ऋतुराजने 5 पैकी 4 सामन्यांमध्ये शतकं केली. यंदाच्या मोसमात ऋतुराजने सर्वाधिक 603 रन केले आहेत. इतर कोणत्याही खेळाडूला 400 रनचा टप्पाही ओलांडता आलेला नाही.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राला एलिट ग्रुप-डीमध्ये स्थान मिळालं होतं. या ग्रुपमध्ये केरळ, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राने 5 पैकी प्रत्येकी 4-4 विजय मिळवले होते, पण नेट रनरेटमुळे महाराष्ट्राची टीम तिसऱ्या क्रमांकावर राहिली, त्यामुळे त्यांना नॉकआऊटमध्ये प्रवेश मिळाला नाही. केरळचा नेट रनरेट 0.974, मध्य प्रदेशचा नेट रनरेट 0.485 तर महाराष्ट्राचा नेट रनरेट 0.104 एवढा होता. प्रत्येक ग्रुपमधल्या टॉप-2 टीम पुढच्या राऊंडला जाणार होत्या.

महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने मंगळवारी स्पर्धेतली सगळ्यात मोठी खेळी केली. चंडीगडविरुद्ध त्याने 132 बॉलमध्ये 168 रन केले, यात 12 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. ऋतुराजने या इनिंगमध्ये 127 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. संपूर्ण स्पर्धेत त्याने 5 सामन्यांमध्ये 151 च्या सरासरीने 603 रन केले, यात 4 शतकं होती. तसंच त्याने 51 फोर आणि 19 सिक्सही मारले, म्हणजेच त्याने एकूण 70 बाऊंड्री ठोकल्या. या कामगिरीमुळे ऋतुराजने दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या वनडे सीरिजसाठीची आपली दावेदारी मजबूत केली आहे. 4 शतकांसह त्याने विराट कोहलीच्या यादीतही स्थान मिळवलं आहे.

विजय हजारे ट्रॉफीचे तीन प्री क्वार्टर फायनलचे सामने 19 डिसेंबरला होणार आहेत. पहिला सामना विदर्भ आणि त्रिपुरामध्ये, दुसरा कर्नाटक-राजस्थान, तिसरा उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशमध्ये होईल. क्वार्टर फायनल 21 आणि 22 डिसेंबरला होतील. 5 टीम आधीच क्वार्टर फायनलला पोहोचल्या आहेत. केरळ आणि सर्व्हिसेस यांच्यातला अंतिम-8 चा साना 22 डिसेंबरला होईल. तामिळनाडू, हिमाचल आणि सौराष्ट्रचा मुकाबला प्री क्वार्टर फायनल जिंकणाऱ्या टीमशी होईल. सेमी फायनल 24 आणि फायनल 26 डिसेंबरला होणार आहे.

First published: