मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला टीम इंडियातून डच्चू, आता केलं धडाकेबाज शतक

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला टीम इंडियातून डच्चू, आता केलं धडाकेबाज शतक

इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला डच्चू देण्यात आला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला डच्चू देण्यात आला आहे.

इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला डच्चू देण्यात आला आहे.

मुंबई, 22 फेब्रुवारी : इंग्लंडविरुद्धच्या पाच टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय टीमची (India vs England) घोषणा करण्यात आली आहे. या टीममधून कृणाल पांड्या (Krunal Pandya) याला डच्चू देण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धच्या या सीरिजला 12 मार्चपासून सुरूवात होणार आहे. टीम इंडियामधून बाहेर झाल्यानंतर उलट कृणाल पांड्याचं प्रदर्शन सुधारलं आहे. विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare) च्या पहिल्या दोन मॅचमध्ये कृणाल पांड्याने बॅट आणि बॉलने उल्लेखनीय कामगिरी करत भारताच्या वनडे टीमसाठी दावा ठोकला आहे. इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे मॅचच्या सीरिजला 23 मार्चपासून सुरूवात होणार आहे. कृणालने विजय हजारे ट्रॉफीमध्ये अशीच कामगिरी केली, तर त्याला भारताच्या वनडे टीममध्ये जागा मिळू शकते.

विजय हजारे ट्रॉफीच्या दुसऱ्या मॅचमध्ये बडोद्याने त्रिपुराचा 6 विकेटने पराभव केला. बडोद्याचा हा लागोपाठ दुसरा विजय आहे. या दोन्ही मॅचमध्ये कृणाल पांड्या चमकला. मॅचमध्ये त्रिपुराने पहिले बॅटिंग करत 7 विकेट गमावून 302 रन केले. त्रिपुराने एवढा मोठा स्कोअर केला तरी कृणालने 10 ओव्हरमध्ये फक्त 45 रन देऊन 1 विकेट घेतली. हे आव्हान बडोद्याने एक ओव्हर बाकी असताना पूर्ण केलं. कृणालने 97 बॉलमध्ये नाबाद 127 रन केले. कृणालच्या या खेळीमध्ये 20 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता.

कृणाल पांड्याची ही 63वी लिस्ट ए मॅच होती. हे त्याचं पहिलंच शतक होतं. 29 वर्षांच्या कृणालने गोव्याविरुद्धच्या पहिल्या मॅचमध्ये तीन विकेट घेतल्या होत्या आणि 71 रनची खेळी केली होती. दोन मॅचमध्ये त्याने 200 पेक्षा जास्त रन करून 4 विकेटही घेतल्या आहेत.

कृणालने त्याच्या करियरमध्ये 192 मॅच खेळल्या आहेत, यात त्याचं हे तिसरं शतक होतं. त्याने दोन शतकं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये केली आहेत. प्रथम श्रेणीच्या 8 मॅचमध्ये 31 च्या सरासरीने 470 रन केले आणि 14 विकेट घेतल्या. एकूण टी-20 मध्ये कृणाल 121 मॅच खेळला आणि त्याने 1,524 रन केल्या आहेत. याशिवाय त्याने 89 विकेटही घेतल्या. कृणाल आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

First published: