IPL आधी विराटची चिंता मिटली, फेवरेट खेळाडूची शतकांची हॅट्रिक

IPL आधी विराटची चिंता मिटली, फेवरेट खेळाडूची शतकांची हॅट्रिक

आयपीएल 2021 (IPL 2021) आधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि त्यांचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांची चिंता मिटली आहे, कारण मागच्या मोसमात ओपनिंगला खेळणारा देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : आयपीएल 2021 (IPL 2021) आधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) आणि त्यांचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) यांची चिंता मिटली आहे, कारण मागच्या मोसमात ओपनिंगला खेळणारा देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) देवदत्त पडिक्कलने रेल्वेविरुद्ध शानदार शतक केलं. या स्पर्धेतलं पडिक्कलचं हे लागोपाठ तिसरं शतक आहे. या मॅचमध्ये रेल्वेने कर्नाटकला विजयासाठी 285 रनचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान कर्नाटकने 57 बॉलआधीच पूर्ण केलं.

देवदत्त पडिक्कलने मॅचमध्ये नाबाद 145 रन केले, तर कर्णधार रवीकुमार समर्थनेही 130 रनची खेळी केली. पडिक्कलच्या या खेळीमध्ये 9 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता. या मॅचमध्ये कर्नाटकने रेल्वेचा 10 विकेटने पराभव केला.

चार दिवसांपूर्वी ओडिसाविरुद्ध पडिक्कलने आपल्या करियरचा सगळ्यात मोठा स्कोअर 152 रन केले होते. या खेळीमध्ये त्याने 14 फोर आणि 5 सिक्स मारले. यानंतर केरळविरुद्ध त्याने नाबाद 126 रन केले. विजय हजारे ट्रॉफीच्या पहिल्या दोन्ही मॅचमध्ये पडिक्कलने अर्धशतक केलं होतं. उत्तर प्रदेशविरुद्ध त्याने 52 रन तर बिहारविरुद्ध 97 रन केले होते.

विजय हजारे स्पर्धेत पडिक्कल सध्या सर्वाधिक स्कोअर करणारा खेळाडू आहे. पाच मॅचमध्ये त्याने 190 च्या स्ट्राईक रेटने 572 रन केले. यावर्षीच्या प्रत्येक मॅचमध्ये त्याने 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन केल्या आहेत.

मागच्याच वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण

कर्नाटकच्या या बॅट्समनने मागच्याच वर्षी आयपीएलमध्ये पदार्पण केलं. आरसीबीकडून खेळताना पडिक्कल एरॉन फिंचसोबत ओपनिंगला यायचा. मागच्या आयपीएलमध्येही तो आरसीबीकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. 15 मॅचमध्ये त्याने 473 रन केले होते, यात 5 शतकांचा समावेश होता. 124 च्या स्ट्राईक रेटने त्याने रन केले. पडिक्कलच्या या कामगिरीमुळे बँगलोरने मागच्यावर्षी आयपीएल प्ले-ऑफ गाठली होती. आयपीएलच्या यंदाच्या लिलावाआधी आरसीबीने एरॉन फिंचला सोडून दिलं, पण देवदत्त पडिक्कलला मात्र टीममध्ये कायम ठेवलं. या मोसमात तो विराट कोहलीसोबत ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे.

Published by: Shreyas
First published: February 28, 2021, 9:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या