मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Vijay Hazare Trophy : टीम इंडियाला मिळाला नवा स्टार! 21 वर्षांच्या खेळाडूने ठोकले नाबाद 169 रन

Vijay Hazare Trophy : टीम इंडियाला मिळाला नवा स्टार! 21 वर्षांच्या खेळाडूने ठोकले नाबाद 169 रन

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) युवा खेळाडूंची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांच्यानंतर आता या यादीत 21 वर्षांच्या अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) समावेश झाला आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 13 डिसेंबर : विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) युवा खेळाडूंची धमाकेदार कामगिरी सुरूच आहे. ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) यांच्यानंतर आता या यादीत 21 वर्षांच्या अभिषेक शर्माचा (Abhishek Sharma) समावेश झाला आहे. पंजाबच्या या खेळाडूने रविवारी सर्व्हिसेस विरुद्ध (Punjab vs Services) नाबाद 169 रनची खेळी केली. अभिषेकच्या या खेळीमुळे पंजाबने सर्व्हिसेसचा 9 विकेटने पराभव केला. राजस्थानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफीमधला हा पंजाबचा लागोपाठ तिसरा विजय आहे. सर्व्हिसेसविरुद्धच्या मॅचमध्ये विजयाचा हिरो राहिलेल्या अभिषेकने एक दिवस आधी आसामविरुद्ध 56 रन केले होते.

4 सप्टेंबर 2000 साली अमृतसरमध्ये जन्मलेला अभिषेक शर्मा डावखुरा बॉलरही आहे. सर्व्हिसेसविरुद्ध त्याने 117 बॉलमध्ये नाबाद 169 रन केले. या इनिंगमध्ये त्याने 9 सिक्स आणि 17 फोर मारले. अभिषेकने 144.44 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. अभिषेकच्या या खेळीच्या जोरावर पंजाबने 37.5 ओव्हरमध्ये एक विकेट गमावून विजय मिळवला. अभिषेकची ही खेळी बघून तो द्विशतक करेल, असं वाटत होतं, पण सर्व्हिसेसने पंजाबला तेवढ्या रनचं आव्हानच दिलं नव्हतं.

सर्व्हिसेसने या सामन्यात टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. यानंतर त्यांनी 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 260 रन केले. सर्व्हिसेसकडून मोहित अहलावतने 71 आणि कर्णधार रजत पालीवालने 85 रन केले. पंजाबकडून अभिषेकच्या 169 रनशिवाय प्रभसिमरन सिंगने 72 रनची खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक स्कोअर करणाऱ्या पंजाबच्या खेळाडूंच्या यादीत अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर आला आहे.

169* अभिषेक शर्मा विरुद्ध सर्व्हिसेस, 2021

167 प्रभसिमरन सिंग विरुद्ध विदर्भ, 2021

159 दिनेश मोंगिया विरुद्ध जम्मू-कश्मीर, 2000

अभिषेक शर्मा पहिल्यांदा विनू मंकड ट्रॉफीमध्ये पंजाबच्या अंडर-19 टीममधून पदार्पणातच शतक केल्यामुळे चर्चेत आला होता. 2016 अंडर-19 आशिया कपमध्ये अभिषेकने भारतीय विजयाचं नेतृत्व केलं होतं. आयपीएलमध्ये दिल्लीने जानेवारी 2018 साली अभिषेकला 55 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात त्याने 19 बॉलमध्ये नाबाद 46 रन केले होते. दिल्लीशिवाय अभिषेक आयपीएलमध्ये हैदराबादकडूनही खेळला आहे.

First published: