IPLमध्ये रोहितनं दिली नाही संधी, आता हाच गोलंदाज उडवतोय फलंदाजांची झोप

IPLमध्ये रोहितनं दिली नाही संधी, आता हाच गोलंदाज उडवतोय फलंदाजांची झोप

विजय हजारे करंडक स्पर्धेत सध्या युवा खेळाडूंच्या नावाच्या चर्चा आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर : विजय हजारे करंडक स्पर्धेत सध्या युवा खेळाडूंच्या नावाच्या चर्चा आहेत. रोज कोणते ना कोणते युवा खेळाडू विक्रम प्रस्थापित करत असतात. अशाच एका युवा गोलंदाजानं फलंदाजांना हैराण केले आहे. एलीट ग्रुप ए आणि बी यांच्यातील उत्तर प्रदेश आणि ओडिशा यांच्यात झालेल्या सामन्यात एका युवा गोलंदाजानं सर्वांचे लक्ष वेधले त्याचे नाव आहे मोहसीन खान.

मोहसीननं या सामन्यात 5 विकेट घेत उत्तर प्रदेश संघाला मोठा विजय मिळवून दिला. मोहसीनच्या गोलंदाजीनं ओडिसाचा संपूर्ण संघ ढेर झाला. त्यानं फक्त 128 धावांवर ओडिसाला बाद केले. त्यामुळं विजय हजारे स्पर्धेसाठी भारताला फक्त 129 धावांची गरज होती.

दरम्यान, याच मोहसीनला 2018मध्ये आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघानं विकत घेतले होते. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्स संघानं त्याला 2 वर्ष बाकावर बसवले.

वाचा-क्रिकेटमधली ऐतिहासिक घटना, 17 वर्षांच्या भारतीय फलंदाजानं केले विक्रमी द्विशतक!

विजय हजारे स्पर्धेत मोहसीनची वादळी गोलंदाजी

उत्तर प्रदेशचा जलद गोलंदाज मोहसीन खाननं (Mohsin Khan) ओडिशाच्या फलंदाजांची झोप उडवली. मोहसीननं सगळ्याच आधी शिकार केली ती गोविंद पोद्दारची, मोहसीननं त्याल क्लिन बोल्ड केले. त्यानंतर त्यानं लगेचच दोन खेळाडूंची शिकार केली. त्यानंतर मोहसीननं हॅट्रीक घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. मोहसीननं 8.4 ओव्हरमध्ये 27 धावा देत 6 विकेट घेतल्या. त्यानं 3.12च्या इकोनॉमीनं गोलंदाजी केली.

वाचा-विराटचा पत्ता लवकरच होणार कट? ‘या’ कारणामुळे रोहित होऊ शकतो नवा कर्णधार

जहीर खानचा फॅन आहे मोहसीन

मोहसीन खान हा त्याच्या जलद गोलंदाजीमुळं ओळखला जातो. दरम्यान मोहसीनचा गोलंदाजीचा आदर्श आहे तो, जहीर खान. मोहसीन 140 किमी/ प्रति वेगानं गोलंदाजी करतो. मोहसीनला आयपीएलमध्ये सामिल करण्यात आले होते. मात्र त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळं जहीर खानसोबत खेळण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.

वाचा-पुन्हा एकदा दिसणार ‘सचिन पर्व’, दिग्गजांविरुद्ध उतरणार टी-20च्या मैदानात

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

First published: October 17, 2019, 7:55 AM IST
Tags: ipl

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading