क्रिकेटमधली ऐतिहासिक घटना, 17 वर्षांच्या भारतीय फलंदाजानं केले विक्रमी द्विशतक!

17 वर्षीय यशस्वी जयस्वालनं 154 चेंडूत 17 चौकार आणि 12 षटकार लगावत 131.82च्या स्ट्राईक रेटनं द्विशतक केले.

News18 Lokmat | Updated On: Oct 16, 2019 02:20 PM IST

क्रिकेटमधली ऐतिहासिक घटना, 17 वर्षांच्या भारतीय फलंदाजानं केले विक्रमी द्विशतक!

मुंबई, 16 ऑक्टोबर : मुंबई आणि झारखंड यांच्याच विजय हजारे ट्रॉफीमध्ये सुरू असलेल्या सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी झाली आहे. या सामन्याच मुंबईकडून खेळणाऱ्या सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालनं विक्रमी कामगिरी केली आहे. 17 वर्षीय यशस्वी जयस्वालनं 154 चेंडूत 17 चौकार आणि 12 षटकार लगावत 131.82च्या स्ट्राईक रेटनं द्विशतक केले. याचबरोबर यशस्वी द्विशतकी कामगिरी करणारा जगातील सर्वात लहान क्रिकेटरला ठरला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटच्या दुहेरी शतक करणारा यशस्वी पहिला फलंदाज ठरला आहे.

याआधी विजय हजारे करंडक स्पर्धेत संजू सॅमसननं दुहेरी शतक करण्याची कामगिरी केली होती. त्यामुळं या स्पर्धेतील हे दुसरे दुहेरी शतक आहे. यासह यशस्वी 17 वर्ष 292 दिवसांनी दुहेरी शतक करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे.

वाचा-बाप तसा बेटा! अर्जुन तेंडुलकरमुळे पालटलं 'या' गरीब मुलांच नशीब

यशस्वीनं केले अनेक महान पराक्रम

यशस्वी दुहेरी शतक करणारा सर्वात लहान खेळाडू ठरला आहे. याशिवाय विजय ट्रॉफीमध्ये एका सामन्यातील पहिल्या डावात सर्वात जास्त 12 षटकार लगावण्याची कामगिरी त्यानं केली आहे. झारखंड विरोधात दुहेरी शतक करत लिस्ट ए क्रिकेटमध्ये पदार्पण करत पहिल्याच स्पर्धेत अशी कामगिरी करणारा हा पहिला फलंदाज ठरला आहे. यशस्वीनं आतापर्यंत 5 सामन्यात 100हून अधिकच्या सरासरीनं धावा केल्या आहेत. त्यानं 504 धावा केल्या आहेत, यात 3 शतकांचा समावेश आहे. यात त्यानं मुंबईकडून सर्वात जास्त 20 षटकार तर 44 चौकार लगावले आहेत.

दुहेरी शतक करणारा सहावा भारतीय

लिस्ट ए क्रिकेटमध्ये भारताकडून दुहेरी शतक करणारा जशस्वी जयस्वाल सहावा खेळाडू आहे. यशस्वीच्या आधी महान फलंदाज सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रोहित सर्मा, करनवीर कौशल आणि संजू सॅमसन यांनी ही कामगिरी केली आहे. असे असले तरी, यशस्वी दुहेरी शतक करणारा सर्वात लहान फलंदाज ठरला आहे.

वाचा-पुन्हा एकदा दिसणार ‘सचिन पर्व’, दिग्गजांविरुद्ध उतरणार टी-20च्या मैदानात

मुंबईतर पाणीपुरी विकायचा यशस्वी

विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक मुंबईचा खेळाडू सर्वांचे लक्ष वेधत आहे. यशस्वीनं आपल्या वेगळ्या फलंदाजी शैलीनं सगळ्यांचे मन जिंकले आहे. हा तोच यशस्वी आहे, जो कधी मुंबईमध्ये पाणीपुरीची गाडी लावायचा. मात्र एकेदिवशी आझाद मैदानात क्रिकेट खेळत असताना त्यानं हातात घेतलेली बॅट पुन्हा खाली ठेवली नाही. विशेष म्हणजे यशस्वीच्या यशामागे अर्जुन तेंडुलकरचा मोठा हात आहे.

अर्जुन आणि सचिन तेंडुलकरनं बदललं नशीब

अर्जुन आणि यशस्वी खुप चांगले मित्र आहेत. या दोघांची मैत्री बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झाली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ट्रेनिंग घेत असताना अर्जुन आणि यशस्वी एकाच खोलीत राहायते. यावेळी यशस्वीनं तो सचिनचा खुप मोठा फॅन असल्याचे सांगितले. त्यानंतर अर्जुननं यशस्वी आणि सचिन यांची भेट घडवून आणली. 2018मध्ये यशस्वी आणि अर्जुन यांची भेट झाली. दरम्यान, यावेळी मास्टर ब्लास्टरही यशस्वीच्या खेळीचा फॅन झाला. त्यामुळं खुश होऊन सचिननं यशस्वीला एक बॅट भेट दिली. एवढेच नाही तर याच बॅटनं यशस्वीनं क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

वाचा-‘गांगुली होता म्हणून भारतानं पाकिस्तानला नमवलं’, माजी क्रिकेटपटूचा गौप्यस्फोट

कशी तयार होते करवंटीपासून आकर्षक पणती? पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 16, 2019 02:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...