बाप तसा बेटा! अर्जुन तेंडुलकरमुळे पालटलं 'या' गरीब मुलांच नशीब

बाप तसा बेटा! अर्जुन तेंडुलकरमुळे पालटलं 'या' गरीब मुलांच नशीब

अर्जुनच्या मदतीनं पाणीपुरी विकणारा हा खेळाडू झाला स्टार क्रिकेटपटू.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर : क्रिकेट विश्वात सचिन तेंडुलकरचे नाव आजही सन्मानने घेतले जाते. कारण सचिनला आजही क्रिकेटचा देव मानले जाते. एवढेच नाही तर क्रिकेटच्या विकासासाठीही आणि खेळाडूंच्या प्रगतीसाठी सचिननं खुप काम केले आहे. तशीच काहीशी कामगिरी आपल्या वडिलांच्या पायावर पाऊल टाकत अर्जुन करत आहे.

सध्या होत असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये एक मुंबईचा खेळाडू सर्वांचे लक्ष वेधत आहे, या यशस्वी जयस्वालच्या क्रिकेटमागे मोठा हात आहे तो अर्जुन तेंडुलकरचा. विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे प्रदर्शन विशेष चांगले राहिलेले नाही. मुंबईनं 7 सामन्यांमध्ये 3 सामने जिंकले आहेत तर 2 सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. मात्र या संघात असलेला 17 वर्षीय यशस्वी जयस्वाल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. यशस्वीनं आपल्या वेगळ्या फलंदाजी शैलीनं सगळ्यांचे मन जिंकले आहे. हा तोच यशस्वी आहे, जो कधी मुंबईमध्ये पाणीपुरीची गाडी लावायचा. मात्र एकेदिवशी आझाद मैदानात क्रिकेट खेळत असताना त्यानं हातात घेतलेली बॅट पुन्हा खाली ठेवली नाही. विशेष म्हणजे यशस्वीच्या यशामागे अर्जुन तेंडुलकरचा मोठा हात आहे.

अर्जुननं केले जयस्वाललं यशस्वी

अर्जुन आणि यशस्वी खुप चांगले मित्र आहेत. या दोघांची मैत्री बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झाली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ट्रेनिंग घेत असताना अर्जुन आणि यशस्वी एकाच खोलीत राहायते. यावेळी यशस्वीनं तो सचिनचा खुप मोठा फॅन असल्याचे सांगितले. त्यानंतर अर्जुननं यशस्वी आणि सचिन यांची भेट घडवून आणली.

सचिनच्या भेटीमुळं बदललं यशस्वीचं नशीब

2018मध्ये यशस्वी आणि अर्जुन यांची भेट झाली. दरम्यान, यावेळी मास्टर ब्लास्टरही यशस्वीच्या खेळीचा फॅन झाला. त्यामुळं खुश होऊन सचिननं यशस्वीला एक बॅट भेट दिली. एवढेच नाही तर याच बॅटनं यशस्वीनं क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

यशस्वीनं याआधी अंडर-19 श्रीलंका दौऱ्यात आपल्या फलंदाजीची झलक दाखवली होती.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये यशस्वीचे प्रदर्शन

विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडे खेळणाऱ्या यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) 4 सामन्यात कमाल केली. त्यानं फक्त 4 सामन्यात 301 धावा केल्या. या स्पर्धेत यशस्वीनं 75.25च्या सरासरीनं धावा केल्या. यशस्वीनं या स्पर्धेत केरळ विरोधात 122 तर गोवा विरोधात 113 धावांची शतकी खेळी केली होती.

VIDEO : विधानसभा निवडणुकीत वंचितचं भविष्य काय? रामदास आठवले म्हणाले...

Published by: Priyanka Gawde
First published: October 16, 2019, 9:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading