ICC Under 19 Asia Cup गाजवणाऱ्या मराठमोळ्या खेळाडूची विजय हजारे करंडक स्पर्धेत एण्ट्री!

ICC Under 19 Asia Cup गाजवणाऱ्या मराठमोळ्या खेळाडूची विजय हजारे करंडक स्पर्धेत एण्ट्री!

विजय हजारे करंडक स्पर्धेत अंडर-19 आशियाई कपमध्ये भारताला विजय मिळवणाऱ्या मुंबई कर हुकुमी एक्क्याची संघात निवड झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये रणजी एवढीच महत्त्वाची असलेली आणखी एक स्पर्धा म्हणजे विजय हजारे करंडक. या स्पर्धेमुळं अनेक दिग्गज खेळाडू भारतीय संघाला मिळाले. दरम्यान आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेतही युवा खेळाडूंचा भरणा करण्यात आला आहे. नुकतीच मुंबईच्या संघाची घोषणा करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे या संघात अंडर-19 आशियाई कपमध्ये भारताला विजय मिळवणाऱ्या मुंबई कर हुकुमी एक्क्याची संघात निवड झाली आहे. या खेळाडूचं नाव आहे अथर्व अंकोलेकर.

ICC Under 19 Asia Cupमध्ये भारतानं सातव्यांदा आशियाई कपचा किताब मिळवला. अटीतटीच्या या सामन्यात भारतानं अवघ्या पाच धावांमध्ये बांगलादेशला नमवले. भारतीय फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळं भारताचा संपूर्ण संघ 106 धावांचा बाद झाला. दरम्यान बांगलादेशनं 33 ओव्हरमध्ये 101 धावांतच गारद झाली. यात भारताचा हिरो ठरला हो मुंबईकर अथर्व अंकोलेकर. अथर्वनं 8 ओव्हरमध्ये 28 धावा देत 5 विकेट घेत उत्कृष्ठ कामगिरी केली.

दरम्यान यंदाच्या हजारे करंडकमध्ये श्रेयस अय्यरकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं असून सूर्यकुमार यादव मुंबईचा उप-कर्णधार असणार आहे. 24 सप्टेंबरपासून मुंबईचा संघ आपले सर्व सामने बंगळुरुत खेळणार आहे. 17 सदस्यीय संघाची घोषणा करताना निवड समितीने सर्फराज खानला संघात स्थान दिलं आहे.

वाचा-मुंबईकर अथर्व अंकोलेकरची 'बेस्ट' कामगिरी! सातव्यांदा भारतानं जिंकला आशियाई कप

अंडर-19 आशियाई चषक सामन्यात हिरो ठरलेला अथर्व दहा वर्षांचा असताना 2019मध्ये बेस्टमध्ये कंडक्टर असलेल्या त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर अर्थवची आई वैदही अंकोलेकर यांनी कंडक्टरची नोकरी स्विकारत अर्थवला वाढवले. अथर्व डावखुरा फिरकीपटू असून सध्या रिझवी कॉलेजमध्ये 12वीचे शिक्षण घेत आहे. दरम्यान अथर्वची संघात निवड झाल्यानंतर त्याच्या आईला जवळजवळ 40 हजार संदेश आले होते.

वाचा-धोनी काही कर पण पुढची मालिका खेळ! चाहत्यांची आर्तहाक, PHOTO VIRAL

अथर्वनं सचिनला केले होते बाद

9 वर्षांपूर्वी एका सराव सामन्यादरम्या अथर्वनं मास्टर ब्लास्टर सचिनला बाद केले होते. सचिनचं त्याच्या गोलंदाजीचे कौतुक केले होते. सचिनला बाद केल्यानंतर त्यांनी स्वत:ची सही असलेली एक बॅटही बक्षिस म्हणून अथर्वला दिली होती.

विजय हजारे करंडकासाठी मुंबईचा संघ –

श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), आदित्य तरे (यष्टीरक्षक), सर्फराज खान, शिवम दुबे, शुभम रांजणे, एकनाथ केरकर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, यशस्वी जैस्वाल, कृतिक हंगवाडी, शशांक अतार्डे.

वाचा-मॅच फिक्सिंगची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यानं घेतले विराट आणि धोनीचे नाव!

VIDEO 'इलाका हमारा धमाका भी हमारा' आदित्य ठाकरेंचं ठाकूरांना थेट आव्हान

Published by: Priyanka Gawde
First published: September 17, 2019, 9:38 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading