प्रवीण मुधोळकर, 07 फेब्रुवारी :कर्णधार फैज फाजलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या विदर्भाच्या संघानं सलग दुसऱ्यांदा मानाच्या रणजी करंडक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. विदर्भानं 78 धावांनी सौराष्ट्राचा पराभव केला. विदर्भानं विजयासाठी दिलेलं 207 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना सौराष्ट्राचा संघ 127 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विदर्भाकडून आदित्य सरवटे ठरला विजयाचा शिल्पकार ठरला. त्यानं सामन्यात 11 गडी बाद केले. यानंतर रणजी ट्रॅाफी विजेत्या संघाला बीसीसीआयकडून दोन कोटी आणि विदर्भ क्रिकेट असोसिएशनकडून 3 कोटींचं बक्षिस देण्यात आले आहे.