मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

जशास तसे पाहा VIDEO! मैदानात r ashwin ने घेतला ऋतुराजशी पंगा; पण…

जशास तसे पाहा VIDEO! मैदानात r ashwin ने घेतला ऋतुराजशी पंगा; पण…

जशास तसे! मैदानात अश्विनने घेतला ऋतुराजशी पंगा; पण...

जशास तसे! मैदानात अश्विनने घेतला ऋतुराजशी पंगा; पण...

दिल्लीच्या १७३ धावांचा पाठलाग करण्यासाठी सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)आणि रॉबिन उथप्पा(Robin uthappa) यांनी ११० धावांची भागीदारी केली होती. ही जोडगोळी तोडण्यासाठी आर अश्विनेने(R ashwin) चालाखी करण्याचा प्रयत्न केला पण ऋतुराजने त्याचा डाव उलटून लावला,

पुढे वाचा ...
  • Published by:  Dhanshri Otari

दुबई, 11 ऑक्टोबर: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स(CSKvsDC) या दोन्ही संघांमध्ये रविवारी (10 ऑक्टोबर) चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान, मैदानातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दिल्लीच्या 173 धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सीएसकेकडून ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad)आणि रॉबिन उथप्पा(Robin uthappa) यांनी 110 धावांची भागीदारी केली होती. ही जोडगोळी तोडण्यासाठी आर अश्विनेने(R ashwin) चालाखी करण्याचा प्रयत्न केला पण ऋतुराजने त्याचा डाव उलटून लावला आहे.

चेन्नईच्या डावातील 9व्या षटकात आर अश्विन व ऋतुराज यांच्यात मजेशीर किस्सा घडला. अश्विन गोलंदाजी करत होता आणि ऋतुराज स्ट्राईकवर होता. ऋतुराज फलंदाजीसाठी तयार असताना अश्विनने गोलंदाजीसाठी रनअप घेतले आणि नॉन स्ट्रायकर एंडला येऊन थांबला. मग पुढे ऋतुराजने त्याची फिरकी घेतली.

9 वे षटक सुरू असताना आर अश्विन गोलंदाजीला आला होता. त्यावेळी चौथा चेंडू टाकत असताना आर अश्विनने रनअप घेतला आणि चेंडू टाकणार इतक्यात तो थांबला. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी रनअप घेतला. त्यावेळी चेंडू टाकणार इतक्यात ऋतुराज गायकवाड यष्टीसमोरून सरकला.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आर अश्विन आणि ऋतुराज गायकवाड यांच्यातील हा प्रकार पाहून डगआऊटमध्ये बसलेल्या रिकी पाँटिंगला देखील हसू अनावर झाले होते.

दिल्ली कॅपिटल्सनं पृथ्वी शॉ, शिमरोन हेटमायर आणि रिषभ पंत यांच्या खेळीच्या जोरावर 5 बाद 172 धावा केल्या. प्रत्युत्तरात रॉबीन उथप्पा ( 63) व ऋतुराज गायकवाड (70) यांच्या 110 धावांच्या भागीदारी नंतर महेंद्रसिंग धोनीनं ( MS Dhoni) 6 चेंडूंत 3 चौकार व 1  षटकार खेचून नाबाद 18 धावा करताना चेन्नईला फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. चेन्नईला अखेरच्या षटकात १३ धावा हव्या होत्या. टॉम कुरनच्या षटकात धोनीनं तीन खणखणीत चौकार खेचले. चेन्नईनं ४ विकेट्स राखून हा सामना जिंकला.

First published:

Tags: Csk, IPL 2021, MS Dhoni, R ashwin