Video: फॉर्म्युला वन ड्रायव्हर सचिन तेंडुलकर; वर्षापासूनचे स्वप्न केले पूर्ण!

Video: फॉर्म्युला वन ड्रायव्हर सचिन तेंडुलकर; वर्षापासूनचे स्वप्न केले पूर्ण!

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पूर्ण केले त्याचे स्वप्न...

  • Share this:

प्राग, 05 जून: भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं गाड्यांवरील प्रेम सर्वांनाच माहिती आहे. पण सचिनला सर्वात प्रिय आहे ती फेरारी. एफ १ म्हणजेच फॉर्म्युला वन हा सचिनचा आणखी एक आवडता छंद आहे. 2011मध्ये इंडियन ग्रॅड प्रिक्स स्पर्धेच्या वेळी सचिन ट्रॅकवर दिसला होता. त्याच्याकडे स्वत:ची फेरारी देखूील आहे. सचिनच्या काही जवळच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईच्या रस्त्यावर रात्री अनेक वेळा तो गाडी चालवण्याचा आनंद घेत असतो. सचिनचे हे गाडीचे प्रेम आता सांगण्याचे कारण म्हणजे ज्या सचिनला तुम्ही क्रिकेटचे मैदान गाजवताना पाहिले आहे. तोच सचिन आता फॉर्म्युला वन ट्रॅकवर फेरारी चालवत आहे.

चेक प्रजासत्ताकची राजधानी प्राग येथे सचिनने फॉर्म्युला वन ट्रॅकवर फेरारी चालवण्याचा अनुभव घेतला. अपोलो टायर्सच्या एका प्रमोशनसाठी सचिन फॉर्म्युला वन कार चालवली. याचा व्हिडिओ सचिनने ट्विटवर शेअर केला आहे. या व्हिडिओसह त्यांने म्हटले आहे की, फॉर्म्युला वन कार चालवण्याची माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. माझे हे स्वप्न अखेर पूर्ण झाले. अपोलो टायर्समुळे प्राग येथे मला फॉर्म्युला वन गाडी चालवण्याची संधी मिळाली. माझ्यासाठीचा हा खुप छान अनुभव होता. यापेक्षा मला अधिक वेगाने फेरारी चालवता येईल का, असे सचिनने ट्विटवर म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2019 05:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading