Home /News /sport /

कोरोना काळातला सर्वाधिक रोमांचक सामना, इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 2 धावांनी मात

कोरोना काळातला सर्वाधिक रोमांचक सामना, इंग्लंडची ऑस्ट्रेलियावर 2 धावांनी मात

यजमान इंग्लंडनं 3 T-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 धावांनी पराभव केला.

    साऊथॅम्प्टन, 05 सप्टेंबर : कोरोना काळात मार्च नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये या वर्षात पराभवाचा सामना करावा लागला. यजमान इंग्लंडनं 3 T-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 2 धावांनी पराभव केला. इंग्लंड संघानं पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारून 162/7 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला 20 षटकांत 160/6 धावांचं लक्ष्य गाठता आलं. 2 धावांमुळे ऑस्ट्रेलियाचा T-20च्या पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. मालिकेचा दुसरा सामना 6 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. हे वाचा-IPL 2020 : चेन्नईच्या संघाला आणखी मोठा झटका; रैनानंतर आता हरभजनही नाही ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 163 धावा करणं गरजेचं होतं. 36 चेंडूत 39 धावांची गरज असताना थोडक्यासाठी हातून पहिल्या सामन्यातील विजय हातून निसटताना पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलिया संघाला शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 15 धावांची आवश्यकता होती. मात्र संघाला एवढं सोपं लक्ष्यही गाठता आलं नाही. संघाला केवळ 12 धावा करण्यात यश आलं आणि यजमान इंग्लंडनं 2 धावांनी संघाचा पराभव केला. डेव्हिड वॉर्नर आणि कर्णधार आरोन फिंच या जोडीनं जवळपास 98 धावांची मजल मारली. मात्र त्यानंतर 14 चेंडूमध्ये ऑस्ट्रेलियाचे 4 गडी तंबूत परतले. तिसऱ्या नंबरवर उतरलेला स्टिव स्मिथ (18) 124वा रन करताना बाद झाला. तर इंग्लंड संघातील जोफ्रा आर्चर, आदिल राशिद यांना सामन्यादरम्यान 2-2 गडी बाद करण्यात यश आलं.
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Australia

    पुढील बातम्या