Home /News /sport /

'हा' विजय कायम लक्षात राहिल, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी केले टीमचे कौतुक

'हा' विजय कायम लक्षात राहिल, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी केले टीमचे कौतुक

'पहिल्या कसोटी (India vs Australia) सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द याच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली.

    मुंबई, 19 जानेवारी : भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या मायभूमीत त्यांचाच पराभव करून इतिहास रचला आहे. भारतीय संघाच्या या धडाकेबाज कामगिरीच देशभरातून कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackery)यांनी  भारताने चौथ्या क्रिकेट कसोटीत ऑस्ट्रेलियावर मिळविलेल्या जोरदार विजयाबद्दल कर्णधार अजिंक्य रहाणे व टीमचे अभिनंदन केले आहे. गाबाच्या मैदानावर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मिळालेला हा विजय सर्व भारतीयांच्या लक्षात राहील, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीमचे कौतुक केले आहे. 'पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर देखील भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्द याच्या जोरावर संपूर्ण कसोटी मालिका जिंकली. धावांचा यशस्वी पाठलाग करताना भारतीय संघानं या मालिकेत नवीन विक्रम प्रस्थापित केला ही देशातील सर्व क्रिकेटवीरांसाठी अभिमानाची बाब आहे' असेही मुख्यमंत्री म्हणतात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा भारतीय संघाचे कौतुक केले आहे. 'ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या यशाने आम्ही सर्वजण आनंदी आहोत. त्यांची उल्लेखनीय उर्जा आणि उत्कंठा सर्वत्र दिसून आली. त्यांचा उत्कृष्ट, उल्लेखनीय धैर्य आणि दृढ संकल्प दिसून आली. भारतीय संघाचे अभिनंदन' असं म्हणत मोदींनी कौतुक केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे. गाबा खेळपट्टीवर 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियन संघाला थरारक कसोटी सामन्यात धूळ चारणाऱ्या भारतीय संघाचे मनपूर्वक अभिनंदन! अजिंक्य रहाणेच्या संघाने बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिका जिंकून नवा इतिहास घडवला, अशा शब्दांत शरद पवारांनी टीम इंडियाची पाठ थोपाटली. तर अभिनेता रितेश देशमुख याने भारतीय टीमचे हटके अभिनंदन केले आहे. 'इंडिया झिंदाबाद, भारतीय संघावर आम्हाला अभिमान आहे, हा सर्वात मोठा विजय आहे', असं रितेश देशमुख म्हणाला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: India vs Australia

    पुढील बातम्या