मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: राज्यसभेत अजिंक्य रहाणेचा बोलबाला! उपराष्ट्रपतींनीही केलं कौतुक

Ind vs Aus: राज्यसभेत अजिंक्य रहाणेचा बोलबाला! उपराष्ट्रपतींनीही केलं कौतुक

 भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) सीरिजमध्ये लाखमोलाची कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचं आणि कसोटीदरम्यान कर्णधारपद ताकदीने सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) नाव आजही सर्वांच्या तोंडी आहे.

    नवी दिल्ली, 02 फेब्रुवारी: अजिंक्य रहाणेवर होणारा कौतुकाचा वर्षाव अद्यापही थांबलेला नाही आहे. भारत-ऑस्ट्रेलिया (India vs Australia) सीरिजमध्ये लाखमोलाची कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाचं आणि कसोटीदरम्यान कर्णधारपद ताकदीने सांभाळणाऱ्या अजिंक्य रहाणेचं (Ajinkya Rahane) नाव आजही सर्वांच्या तोंडी आहे. अनेक महिन्यांनी अशाप्रकारे तोडीस तोड खेळ पाहायला मिळाल्याने हे कौतुक होत आहे. क्रिकेट इतिहासात निचांकी स्कोअरवर आऊट झाल्यानंतर भारतीय टीमने जोरदार पुनरागमन करत टेस्ट सीरिज जिंकली आणि इतिहास घडवला. राज्यसभेतही टीम इंडियाचं कौतुक करण्यात आलं. राज्यसभा सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकया नायडू (M Venkaiah Naidu) यांनी देखील अजिंक्य रहाणे आणि त्याच्या चमूचं कौतुक केलं आहे. त्यांनी या विजयाबद्दल संपूर्ण टीमचं अभिनंदन केलं आहे. याआधी त्यांनी ट्वीट करून देखील टीम इंडियाचं कौतुक केलं होत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देखील त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात भारत-ऑस्ट्रेलिया सीरिजचा उल्लेख केला होता. 'मागचं वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच कठीण होतं. पण भारतीयांनी याचा सामना केला. भारतीय अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम झाला, पण आम्ही चांगलं पुनरागमन केलं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियात शानदार यश मिळवलं. या विजयाने भारतीय लोकांच्या ताकदीची पुन्हा आठवण करून दिली,' असं सीतारामन म्हणाल्या. (हे वाचा-रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी) याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या मन की बात मधून टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक केलं होतं. या महिन्यात क्रिकेटच्या पीचवरून चांगली बातमी मिळाली. आपल्या क्रिकेट टीमने सुरुवातीच्या अडचणींवर मात करत शानदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलियात सीरिज जिंकली. खेळाडूंची कठोर मेहनत आणि त्यांचं टीम वर्क प्रेरणा देणारं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Ajinkya rahane, Cricket, Cricket news, India vs Australia

    पुढील बातम्या