Home /News /sport /

ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची वेंकटेश प्रसादने केली बोलती बंद!

ट्रोल करणाऱ्या पाकिस्तानी पत्रकाराची वेंकटेश प्रसादने केली बोलती बंद!

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 25 वर्षांपूर्वी झालेली 1996 वर्ल्ड कपची फायनल क्रिकेट रसिक आजही विसरू शकत नाहीत. गच्च भरलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आमिर सोहेल (Amir Sohail) आणि वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांच्यात झालेली बाचाबाची आजही सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 एप्रिल : भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात 25 वर्षांपूर्वी झालेली 1996 वर्ल्ड कपची फायनल क्रिकेट रसिक आजही विसरू शकत नाहीत. गच्च भरलेल्या बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आमिर सोहेल (Amir Sohail) आणि वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांच्यात झालेली बाचाबाची आजही सगळ्या क्रिकेट प्रेमींच्या लक्षात आहे. सोहेलनं प्रसादच्या बॉलिंगवर फोर लगावला. त्यानंतर तो बॉल गेला त्या दिशेन बॅट दाखवत, मी तिथं पुन्हा फोर मारणार आहे, असा इशारा सोहेलला दिला. सोहेलच्या या उर्मट वर्तनाला प्रसादनं चोख उत्तर दिलं. त्यानं अगदी पुढच्याच बॉलवर सोहेलला बोल्ड केलं. 'मी इंदिरा नगरचा गुंडा आहे' असा हॅशटॅग वापरत वेंकटेश प्रसादने आमिर सोहेलसोबत झालेल्या वाद आणि बोल्ड घेतल्याचे दोन फोटो पोस्ट केले. पण वेंकटेश प्रसादचं हे ट्वीट पाकिस्तानी पत्रकाराला चांगलंच झोंबलं. प्रसादच्या करियरमधलं एकमेव यश, अशी प्रतिक्रिया नजीब उल हसनेन याने दिली. पाकिस्तानी पत्रकार आणि स्पोर्ट्स एँकर असलेल्या नजीब उल हसनेनला वेंकटेश प्रसादने लगेच प्रत्युतर दिलं. प्रसादच्या या प्रतिक्रियेमुळे हसनेनची बोलतीच बंद झाली. 'नाही हसनेन भाई, इंग्लंडमध्ये 1999 साली झालेल्या पुढच्या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध मॅन्चेस्टरमध्ये 27 रन देऊन 5 विकेट घेतल्या होत्या. पाकिस्तानला 228 रनचा पाठलागही करता आला नव्हता. देव तुमची काळजी घेओ,' असं प्रसाद म्हणाला. भारताचा माजी फास्ट बॉलर असलेला वेंकटेश प्रसाद काही काळ टीम इंडियाचा बॉलिंग प्रशिक्षकही होता. 1996 ते 2001 या कालावधीमध्ये प्रसादने 33 टेस्ट आणि 161 वनडे खेळल्या, यात त्याने 96 टेस्ट आणि 196 वनडे विकेट घेतल्या. 1996च्या क्वार्टर फायनलमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. वर्ल्ड कपच्या आतापर्यंतच्या सगळ्या सामन्यांमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध विजय झाला आहे. IPL 2021 : शांत राहुल द्रविड संतापला, गाडीच्या काचा फोडल्या, विराटही धक्क्यात काय आहे इंदिरानगर का गुंडा? राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) एका जाहिरातीमुळे इंदिरानगर का गुंडा सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) सुरू होण्याआधी केलेल्या एका जाहिरातीमध्ये राहुल द्रविडचा पारा चांगलाच चढल्याचं दिसत आहे. 'इंदिरानगर का गुंडा हूं मै' असं म्हणत ट्रॅफिकमध्ये अडकलेला राहुल द्रविड समोरच्या गाडीवर बॅटने मारत आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या