मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Aus: अँड क्रेडिट गोज टू... यांच्यामुळे पार पडला नागपुरातला सामना, रोहितनंही केलं कौतुक

Ind vs Aus: अँड क्रेडिट गोज टू... यांच्यामुळे पार पडला नागपुरातला सामना, रोहितनंही केलं कौतुक

VCA ग्राऊंड्समन

VCA ग्राऊंड्समन

Ind vs Aus: हा सामना होणार की नाही अशी धाकधूक संध्याकाळपासून स्टेडियममध्ये बसलेल्या नागपूरकरांच्या मनात होती. पण अखेर 9.30 वाजता या सामन्याचा पहिला बॉल पडला.

    नागपूर, 23 सप्टेंबर: नागपूरची लढत जिंकून रोहित शर्माच्या टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्घच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. पण हा सामना केवळ 8-8 ओव्हर्सचा झाल्यानं नागपूरकरांची मात्र निराशा झाली. तब्बल साडेतीन वर्षांनी नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पण हा सामना होणार की नाही अशी धाकधूक संध्याकाळपासून स्टेडियममध्ये बसलेल्या नागपूरकरांच्या मनात होती. पण अखेर 9.30 वाजता या सामन्याचा पहिला बॉल पडला. क्युरेटर, ग्राऊंड्समन खरे हीरो अक्षर पटेल आणि रोहित शर्मा हे भारतीय विजयाचे हीरो असले तरी हा सामना सुरु होण्यासाठी आणि तो सुरळीत व्हावा यासाठी विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या ग्राऊंड्समननी मात्र प्रचंड मेहनत घेतली. गेले काही दिवस नागपुरात बराच पाऊस झाला. त्यामुळे विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानात आऊटफिल्ड बऱ्यापैकी ओली होती. मैदानाच्या एका भागात तर बरेच पॅचेस होते त्यामुळे अम्पायर्सना वेळेत खेळ सुरु करता आला नाही. इतकच नव्हे तर अम्पायर नितीन मेनन आणि अनंत पद्मनाभन यांनी तब्बल चार वेळा मैदानाची पाहणी केली. अखेर 8.45 वाजता सामना 9.30 ला होणार असल्याचं जाहीर केलं. हेही वाचा - Rohit Sharma: हिटमॅन बनला सिक्सर किंग, नागपुरात रोहितच्या नावे हा वर्ल्ड रेकॉर्ड रोहितकडूनही कौतुक नागपूरच्या जामठामधील व्हीसीएच्या या स्टेडियमवर तब्बल 30 हजारपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या होती. जर सामना झाला नसता तर अनेकांची निराशा झाली असती. पण हा सामना व्हावा यासाठी दुपारपासून मैदानात वावरत असलेल्या ग्राऊंड्समनचं टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानंही कौतुक केलं. त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा सामना पार पडला त्यामुळे त्याचं क्रेडिट या ग्राऊंड्समनना द्यायला हवं असंही रोहित म्हणाला. इतकच नव्हे तर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही या ग्राऊंड्समनची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. हैदराबादमध्ये आता निर्णायक लढत तीन सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे 25 तारीखला रविवारी हैदराबादमध्ये होणारा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना जिंकून मालिकाविजयाचा टीम इंडियाचा प्रयत्न राहील.
    Published by:Siddhesh Kanase
    First published:

    Tags: Cricket, Sports

    पुढील बातम्या