TNPL: संघावर झाला होता फिक्सिंगचा आरोप, माजी क्रिकेटपटूनं केली आत्महत्या?

TNPL: संघावर झाला होता फिक्सिंगचा आरोप, माजी क्रिकेटपटूनं केली आत्महत्या?

भारताचा युवा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये? सट्टेबाजांच्या संपर्कात असलेल्यांची BCCI कडून चौकशी

  • Share this:

नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयानं नेमून दिलेल्या समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सोमवारी तामिळनाडु प्रीमीयर लीगमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचे सांगितले. 2013मध्ये आयपीएलमध्ये झालेल्या फिक्सिंगनं भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ माजली. दरम्यान आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटमध्ये फिक्सिंगचे वारे शिरले आहे. आता हा वाद आणखीच चिघळत चालला आहे. या सगळ्या प्रकरणात एक नाव पुन्हा चर्चेत आले आहे, ते म्हणजे आत्महत्या केलेले भारताचे माजी खेळाडू व्ही. बी. चंद्रशेखर. तामिळनाडु प्रीमीयर लीगमध्ये चंद्रशेखर यांचा कांची विरंस नावाचा संघ होता. दरम्यान काही महिन्यांपूर्वी चंद्रशेखर यांनी आत्महत्या करत आपले जिवन संपवले. त्यामुळं आता त्यांच्या आत्महत्येमागे फिक्सिंगचे कारण तर नाही ना, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तामिळनाडु प्रीमीयर लीगच्या यंदाच्या हंगामातील अंतिम सामन्याआधीच मालक चंद्रशेखर यांनी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात या सगळ्या प्रकरणात फिक्सिंगचा संबंध जोडण्यात आला आहे. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “चंद्रशेखर यांच्या जवळच्या नातेवाईकांशी आणि पत्नीशी चर्चा केल्यानंतर टीएनपीएल लीगमध्ये फिक्सिंगचे रॅकेट असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात अद्याप अधिक माहिती पोलिसांना मिळालेली नाही”, असे सांगण्यात आले आहे.

वाचा-भारताच्या आक्रमक क्रिकेटरची आर्थिक अडचणींना कंटाळून आत्महत्या

दरम्यान, चंद्रशेखर यांनी भारतासाठी सात एकदिवसीय सामने आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहभाग घेतला होता. त्यांनी 43.09च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. चंद्रशेखर यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा त्यांचा परिवार आहे. 1988मध्ये तामिळनाडूला रणजी करंडकाचे विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली होती. नंतर प्रशिक्षणाकडे आणि समालोचनाकडे वळलेल्या चंद्रशेखर यांनी बराच काळ राष्ट्रीय निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये पहिली तीन वर्षे त्यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या व्यवस्थापकाची भूमिका निभावली होती.

वाचा-...तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी सट्टेबाजी अधिकृत आणि येणार मॅच फिक्सिंगचा कायदा

टीएनपीएलमध्ये भारतीय खेळाडूंचा भरणा

आतापर्यंत अनेकदा लहान स्पर्धांमध्ये अशा केस समोर आल्या आहेत. पण पहिल्यांदाच बीसीसीआयकडून मान्याता दिलेल्या स्पर्धेत असा प्रकार समोर आला आहे. टीएलपीएलमध्ये 8 संघ आहेत. यामध्ये भारतीय संघातील आर अश्विन, मुरली विजय, विजय शंकर, दिनेश कार्तिक, वॉशिंग्टन सुंदर हे खेळाडूही खेळतात.टीपीएलमध्ये मॅच फिक्सिंगसाठी प्रशिक्षकाला एका सट्टेबाजानं हिऱ्यांचा सेट दिला. त्याआधी प्रशिक्षकानं 25 लाख रुपयांचा सौदा ठरण्यापूर्वी एक एसयुव्ही कार मागितली होती अशी माहिती सूत्रांनी दिली.

वाचा-भारतीय क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग? BCCI नाही तर 'हा' टॉप कॉप लावणार छडा!

भारताचा युवा क्रिकेटपटू मॅच फिक्सिंगमध्ये?

मॅच फिक्सिंग प्रकरणात युवा खेळाडू असल्याची धक्कादायक माहिती एसीयुनं दिली आहे. या खेळाडूची शिफारस एका दिग्गज क्रिकेटपटूनं केली होती. तसेच त्याच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक मदतही संघ मालकांनी त्याला केली होती अशी माहिती समजते. अद्याप कोणाचीही नावे समोर आलेली नाहीत.

वाचा-भारताच्या महिला क्रिकेटरकडून मॅच फिक्सिंगचा प्रयत्न, दोघांविरोधात तक्रार दाखल

VIDEO: सेनेच्या नगरसेवकांची भाजपच्या आमदाराला शिवीगाळ; महापालिकत तुफान राडा

Published by: Priyanka Gawde
First published: September 17, 2019, 5:11 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading