भारताच्या माजी क्रिकेटपटूवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

भारताच्या माजी क्रिकेटपटूवर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

बडोदा क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांनी म्हटलं की, मी किंवा माझ्या कुटुंबियांचे काही बरं वाईट झाल्यास त्याला मुनाफ पटेल जबाबदार असेल.

  • Share this:

बडोदा, 06 सप्टेंबर : भारताचा माजी गोलंदाज मुनाफ पटेलवर बडोदा क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांना जीवे माऱण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. अध्यक्ष देवेंद्र सूरती यांनी नवापुरा पोलीस ठाण्यात त्यांची तक्रार दाखल केली आहे. त्यांनी म्हटलं की, भारताचा माजी क्रिकेटपटू मुनाफ पटेलनंत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, मुनाफ पटेलनं हा आरोप बिनबुडाचा असल्याचं म्हणत फेटाळान लावला आहे. सुरती यांनी सांगितल्यानुसार, मुनाफ पटेलनं गुरुवारी त्यांना धमकी दिली.

नवापुरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आरएम चौहान यांनी सांगितलं की, सूरती यांनी एक अर्ज केला आहे मात्र कोणतही तक्रार दिलेली नाही. यामुळं आतापर्यंत कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार सूरती यांनी म्हटलं आहे की, बडोदा क्रिकेट संघात भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्याबद्दल त्यांना लक्ष्य केलं जात आहे. मुनाफ पटेल सध्या बडोदा क्रिकेट मंडळाच्या वरिष्ठ संघाचा मेंटर आहे.

देवेंद्र सुरती यांनी दिलेल्या अर्जात म्हटलं आहे की, मी पोलिसांना अर्ज दिला आहे. मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झालं तर त्यासाठी मुनाफ पटेलला जबाबदार धरावं. मात्र, मुनाफ पटेलनं हे आरोप फेटाळून लावलं आहे. तो म्हणाला की, ज्या गोष्टींचा सूरती यांना त्रास आहे त्याच्याशी माझं काही देणं घेणं नाही.

मला कोणत्याही कारणाशिवाय यात ओढलं जात आहे. मी फक्त क्रिकेट खेळलो आहे आणि आयुष्यभर हेच करायचं आहे. सूरती यांनी संघाच्या निवडीवरून काही अडचणी आहेत. मी संघाचा मेंटर आहे आणि निवड प्रक्रियेत माझी कोणतीही भूमिका नाही. त्यामुळं त्यांच्याशी वादाचा काहीच संबंध नाही. त्यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं मुनाफ पटेलनं म्हटलं आहे.

भारताकडून मुनाफ पटेलनं 13 कसोटी आणि 70 एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत 35 तर एकदिवसीय सामन्यांत त्याने 86 गडी बाद कऱण्याची कामगिरी केली आहे. त्याने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

VIDEO: जागावाटपावरून सुधीर मुनगंटीवारांचा राऊतांना टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 6, 2019 03:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading