दिल्ली सोडणं पथ्यावर, वर्ल्ड कप जिंकून दिलेल्या क्रिकेटपटूची मोठी कामगिरी

दिल्ली सोडणं पथ्यावर, वर्ल्ड कप जिंकून दिलेल्या क्रिकेटपटूची मोठी कामगिरी

वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतरही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूने गेल्या महिन्यात दिल्लीचा संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता.

  • Share this:

देहराडून, 14 ऑक्टोबर : विजय हजारे ट्रॉफीमध्ये रविवारी उत्तराखंडने सिक्कीमवर 253 धावांनी विजय मिळवला. यामध्ये उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज सन्नी राणाने 26 धावात 5 विकेट घेतल्या. उत्तराखंडने प्रथम फलंदाजी करताना 306 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर सिक्कीमला 21.1 षटकांत 52 धावांत गुंडाळलं. धावांच्या फरकाने उत्तराखंडने हा मोठा विजय मिळवला आहे. गोलंदाजीत सन्नी राणा याच्याशिवाय मंयक मिश्रा आणि प्रदीप चमोली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दरम्यान, त्याआधी फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडल्यानं गोलंदाजांसाठी काम सोपं झालं होतं.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार उन्मुक्त चंद आणि करण कौशल यांनी पहिल्या गड्यासाठी 120 धावांची भागिदारी केली. दोघांनीही प्रत्येकी 54 धावा केल्या. त्यानतंर अवनीश सुधाने 69 आणि तन्मय श्रीवास्तवने 53 धावा केल्या. त्यांनी 117 धावांची भागिदारी केली. त्यानंतर 306 धावांचे आव्हान घेऊन मैदानावर उतरलेल्या सिक्कीमचे आशिश थापा आणि प्लाजोर तमांग हे दोन खेळाडू वगळता एकालाही दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही.

सिक्कीमचे 20 धावांत 6 गडी बाद झाले होते. त्यानंतर थापा आणि तमांग यांनी 7 व्या गड्यासाठी 22 धावांची भागिदारी केली. त्यांनी काही काळ पडझड रोखली. मयंक मिश्राने ही जोडी फोडली आणि त्यानंतर काही वेळातच सिक्किमचा डाव संपुष्टात आला. यामध्ये कर्णधार उन्मुक्त चंदने 1 गडी बाद केला.

उत्तराखंडचे नेतृत्व करणाऱ्या उन्मुक्त याआधी दिल्लीकडून खेळत होता. दिल्लीतून उत्तराखंड संघात येण्याचा त्याचा निर्णय सार्थ ठरवला आहे. विजय हजारे ट्रॉफीत आतापर्यंतच्या 6 सामन्यात त्याने 51.40 च्या सरासरीने 257 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकांचाही समावेश आहे. उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली उत्तराखंडचे 26 गुण झाले आहेत. गुणतक्त्यात पुद्दुचेरीपेक्षा 2 गुणांनी पुढे असून पहिल्या स्थानावर आहे.

वाचा : 14 वर्षांचा आर. प्रागनानंदा ठरला ग्रॅंडमास्टर! भारताला मिळवून दिले असामान्य यश

त्यापूर्वी त्याला भारतीय क्रिकेट संघात प्रवेश मिळवण्यासाठी दावेदार मानलं जात होतं. मात्र खराब कामगिरीमुळं त्याचं हे स्वप्न भंगलं. आयपीएलच्या तीनही हंगामात त्याला कोणत्याही संघाने घेतलं नाही. तसेच दिल्लीकडूनसुद्धा उन्मुक्तला प्रथम श्रेणीचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. अखेर त्यानं दिल्लीला रामराम करत उत्तराखंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

वाचा : संघात जागा मिळाली नाही म्हणून 'हा' स्टार खेळाडू चालवतोय पिक-अप ट्रक, VIDEO VIRAL

उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली भारतानं 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. अंतिम सामन्यात त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्याआधी 2010-11 च्या हंगामात रणजीत गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर 151 धावांची खेळी केली होती. त्याला ज्यूनिअर विराट कोहली म्हणून ओळखलं जात होतं. विशेष म्हणजे दोघेही दिल्लीकडून खेळत होते. तसेच दोघांनीही अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र, उन्मुक्त चंदच्या खराब कामगिरीने त्याला फटका बसला.

वाचा : थरूरांचं भारतीय क्रिकेटपटूवरचं ट्विट चर्चेत, नाराज झालेला श्रीसंत म्हणाला...

दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

Published by: Suraj Yadav
First published: October 14, 2019, 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading