टीम इंडियात मिळाली नाही जागा म्हणून खेळाडूनं सोडला भारत, 'या' देशानं दिली संधी!

टीम इंडियात मिळाली नाही जागा म्हणून खेळाडूनं सोडला भारत, 'या' देशानं दिली संधी!

भारताच्या युवा खेळाडूनं टीम इंडियात जागा मिळाली नाही म्हणून सोडला देश.

  • Share this:

उत्तराखंड, 24 सप्टेंबर : आपल्या देशासाठी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. भारतात प्रत्येक गल्लीत अनेक युवा खेळाडू जन्माला येत असतात. काहींना टीम इंडियात जागा मिळते तर काही खेळाडू घरेलु क्रिकेट खेळत राहतात. यासाठी युवा खेळाडू शाळेत असल्यापासून क्रिकेट खेळतात. यात काही क्रिकेटपटूंना देशासाठी खेळण्याची संधी मिळते तर काही खेळाडू फक्त गल्ली क्रिकेट किंवा घरेलु क्रिकेट खेळत राहतात. दरम्यान काही खेळाडू तर टीम इंडियासाठी खेळत असतानाच इतर देशांकडून क्रिकेट खेळतात. आता मात्र भारताच्या एका युवा खेळाडूनं टीम इंडियात जागा मिळाली नाही म्हणून भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या उत्तराखंडच्या एका खेळाडूनं भारत सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तरखंडकडून खेळणाऱ्या या खेळाडूचे नाव आहे इशान पांडे. उत्तराखंड संघाकडून प्रथम श्रेणीमध्ये खेळणाऱ्या इशान पांडेनं टीम इंडियात स्थान न मिळाल्यामुळं हा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इशान पांडेला नेपाळ संघाकडून क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली आहे.

वाचा-गेल्या 30 आठवड्यात भारत वगळता 6 संघांकडून खेळला ‘हा’ स्टार खेळाडू!

तीन मालिकांसाठी नेपाळकडून खेळणार इशान

युवा खेळाडू इशान पांडेची सिंगापूरमध्ये होणाऱ्या ट्राय सिरिजमध्ये नेपाळकडून खेळण्यासाठी संघात स्थान मिळाले आहे. इशान पांडे डाव्या हाताचा फलंदाज सिंगापूर, नेपाळ आणि झिम्बाम्वे यांच्यात 27 सप्टेंबरपासून होणाऱ्या मालिकेत खेळणार आहे. यांच्यातील पहिला सामना नेपाळ आणि झिम्बाम्वे यांच्यात होणार आहे.

वाचा-‘धोनी एका दिवसात मोठा झाला नाही, मग पंतवर टीका का?’

मोठ्या मेहनतीनं नेपाळ संघात मिळाली जागा

इशान पांडे उत्तराखंडच्या हरिद्वार येथील कनखल येथे राहणारा आहे. डाव्या हाताचा फलंदाज इशान पांडे सुरुवातीच्या काळात भारतीय संघाज जागा मिळवण्यासाठी कष्ट करत होता. मात्र त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून इशानचे कुटुंब नेपाळमध्ये स्थायिक झाले. इशान काठमांडूच्या धुलियाखाल मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी आहे. इशान शिक्षण घेता घेता क्रिकेटही खेळतो. याआधी इशाननं नेपाळच्या अंडर-19 संघाकडून खेळण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर इशानची नेपाळच्या आंतरराष्ट्रीय संघात निवड झाली. 21 वर्षीय इशान झिम्बाम्वे विरोधात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे.

वाचा-टीम इंडियाला मोठा धक्का, दुखापतीमुळं भारताचा हुकमी एक्का कसोटी संघातून बाहेर

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

Tags: team india
First Published: Sep 24, 2019 07:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading