OMG! व्हिडिओ गेम खेळून जिंकले 2 कोटी, वाचा 16 वर्षांच्या मुलाची कमाल

OMG! व्हिडिओ गेम खेळून जिंकले 2 कोटी, वाचा 16 वर्षांच्या मुलाची कमाल

अमेरिकेत 16 वर्षीय मुलानं कम्प्यूटर गेम खेळून चक्क दोन कोटी रुपये कमावले आहेत.

  • Share this:

न्यूयॉर्क, 29 जुलै : अमेरिकेत 16 वर्षीय मुलानं कम्प्यूटर गेम खेळून चक्क दोन कोटी रुपये कमावले आहेत. कोणत्याही इ-स्पोर्ट्समधली ही सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. यामुळं आता अमेरिकेत कम्प्यूटर व्हिडिओ गेमना मांगणी वाढली आहे. 16 वर्षीय कायल जेर्सड्रऑफ यानं ही कामगिरी केली आहे.

कायलही बक्षिसाची रक्कम आर्थर अॅश स्टेडियम न्यूयॉर्क येथे झालेल्या स्पर्धेत देण्यात आली. हे तेच मैदान आहे, जेथे युएस ओपन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ब्रिटनचा जैडेन अॅशमॅन हा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

इ-स्पोर्ट्समधील या स्पर्धेत अंतिम फेरीत जवळ जवळ शंभर खेळाडू होते. एका मोठ्या स्क्रिनवर याचे टेलिकास्ट करण्यात आले होते. यात सर्व स्पर्धेत आपआपल्या कम्प्यूटरवरून हा गेम खेळत होते. तब्बल 10 आठवडे ही स्पर्धात सुरू होती. या स्पर्धेत 30 देशांचे तब्बल 4 कोटी स्पर्धेत सहभागी झाले होते. यात अमेरिकच्या कायल जेर्सड्रऑफनं बाजी मारली.

वाचा-Moneycontrol Pro आता वेबसाइट,अ‍ॅपवर उपलब्ध! आर्थिक नियोजन अधिक सोपं

वाचा-1 ऑगस्टपासून तुमचे वाचणार पैसे, या गोष्टी होणार 'स्वस्त'

स्पर्धेत पडला पैशांचा पाऊस

व्हिडिओ गेमच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे, जेव्हा एका व्हिडिओ गेमवर 700 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. यातील 200 कोटी रक्कमेचे बक्षीस देण्यात आले होते. याच बरोबर शेवटच्या क्वालिफायर स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धेकांना 34.5 लाख रुपये देण्यात आले.

वाचा- इन्कम टॅक्स रिटर्न भरताय? मग 'ही' काळजी घ्यायलाच हवी

man vs wild: पंतप्रधान मोदींचा अ‍ॅडव्हेंचरस अंदाज; पहिला टीझर रिलीज, पाहा VIDEO

Published by: Akshay Shitole
First published: July 29, 2019, 5:43 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading