युएस ओपनला सुरूवात; नादाल शारापोव्हाच्या खेळावर लक्ष

युएस ओपनला सुरूवात; नादाल शारापोव्हाच्या खेळावर लक्ष

नोवॉक जोकोवीक, अँडी मरे हे दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे यावेळी पुरुष एकेरीमध्ये सगळ्यांच्या नजरा रफेल नदाल आणि रॉजर फेडररवर असणार आहेत.

  • Share this:

28 ऑगस्ट: अत्यंत मानाच्या मानल्या जाणाऱ्या युएस ओपन स्पर्धेला आजपासून सुरुवात होते आहे. यावर्षी युएस ओपन कोण जिंकणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

नोवॉक जोकोवीक, अँडी मरे हे दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे यावेळी पुरुष एकेरीमध्ये सगळ्यांच्या नजरा रफेल नदाल आणि रॉजर फेडररवर असणार आहेत. दोघांनीही सुरुवातीचे सामने जिंकले तर उपांत्याफेरीमध्ये नदाल-फेडरर आमने-सामने असू शकतात.

तर दुसरीकडे महिला एकेरीमध्ये मारिया शारापोव्हा पुन्हा एकदा टेनिस कोर्टवर दिसेल. शारापोव्हाला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश मिळाला आहे. गेले काही दिवस मारिया टेनिस कोर्टपासून लांब होती. त्यामुळे पुन्हा एकदा मारिया दणदणीत पुनरागमन करते का तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2017 05:10 PM IST

ताज्या बातम्या