US Open : भारतीयांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून फेडररही म्हणाला I Love India!

US Open : भारतीयांचा उत्साह आणि ऊर्जा पाहून फेडररही म्हणाला I Love India!

स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू सहाव्यांदा युएस ओपन या स्पर्धेचा किताब मिळवण्यासाठी सज्ज आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 03 सप्टेंबर : स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू सहाव्यांदा युएस ओपन या स्पर्धेचा किताब मिळवण्यासाठी सज्ज आहे. मजेशीर गोष्ट म्हणजे फेडररनं हे सगळे किताब 2008च्या आधी जिंकले होते. त्यामुळं बऱ्याच काळापासून फेडररला ग्रॅंडस्लॅमचा किताब जिंकता आलेला नाही. बुधवारी फेडरर युएस ओपन स्पर्धेची उपांत्य फेरीसाठी उतरेल.

दरम्यान या स्टार खेळाडूनं नुकत्याच एका व्हिडिओमध्ये भारतीयांचे आणि भारतीय चाहत्यांचे कौतुक केले आहे. फेडररच्या मते भारतीय खेळाडू हे सर्वात ऊर्जा असलेले आणि प्रेरणादायी असतात. 20 ग्रॅंडस्लॅम जिंकलेल्या फेडररनं यूनिक्सो इंडियासोबत एक व्हिडिओ केला. या व्हिडिओमध्ये फेडररनं भारतीयांचे कौतुक केले. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओत फेडररनं, “मला भारत देश खुप आवडतो. मी तिकडे फिरायला आणि सामना खेळण्यास उत्सुक आहे. हा देश खुपच ऊर्जावान आहे, येथील लोकं नेहमी एकसाथ असतात”, असे मत व्यक्त केले. फेडररनं, 2006, 2014 आणि 2015मध्ये भारत दौरा केला होता.

वाचा-US OPEN : भारताच्या नवख्या खेळाडूची फेडररला कडवी झुंज, पराभवानंतरही जिंकलं मन!

वाचा-विंडिजच्या खेळाडूंमध्ये राहिली नाही ती 'दशहत', भारतानं 17 वर्षात मिळवलं वर्चस्व!

भारतीय खेळाडूनं फेडररला दिली होती कडवी झुंज

2019 या वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं रॉजर फेडररला कडवी झुंज दिली. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडररला पहिल्या सेटमध्ये मागे टाकून सुमितनं धक्का दिला. पण उर्वरित सेट फेडररने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम फेडररच्या नावावर आहे. पहिल्या फेरीत जबरदस्त सुरुवात केल्यानंतर सुमितनं त्यानंतरचे तीन सेट गमावले. फेडररनं 4-6, 6-1, 6-2, 6-4 अशा फरकानं सुमितचा पराभव केला. पहिला आणि शेवटचा सेट फेडररला सुमितनं चांगलीच झुंज दिली. सुमित नागलनं पहिल्या सेटमध्ये 6-4 अशा फरकानं फेडररवर मात केली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये फेडररनं एकतर्फी वर्चस्व गाजवलं. चौथ्या सेटमध्ये सुमित नागलनं कडवी झुंज दिली. फेडररनं चौथा सेट जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला.

वाचा-धक्कादायक! मिताली राजनं निवृत्ती घेतली नाही तर तिला घ्यावी लागली

VIDEO : बाबा रामदेव यांच्या मेळाव्यात दुकानदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

First published: September 3, 2019, 9:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading