US Open मध्ये फेडररला धक्का, दिमित्रोव्हची विजयासह ऐतिहासिक कामगिरी

दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडररला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पराभवाचा धक्का बसला.

News18 Lokmat | Updated On: Sep 4, 2019 12:21 PM IST

US Open मध्ये फेडररला धक्का, दिमित्रोव्हची विजयासह ऐतिहासिक कामगिरी

न्यूयॉर्क, 04 सप्टेंबर : जगातील दिग्गज टेनिस स्टार रॉजर फेडररचं 21 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न भंगलं. त्याला अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमधून बाहेर पडावं लागलं. बुल्गारियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हनं त्याला पराभूत केलं. पाच सेटपर्यंत चाललेल्या लढतीत 3-6, 6-4, 3-6, 6-4, 6-2 ने विजय मिळवला. आता त्याचा सेमीफायनलमध्ये जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रशियन खेळाडू मेदवेदेवशी होणार आहे.

सामन्यावेळी फेडररला पायच्या दुखापतीचा त्रास झाला. त्यानं चौथ्या सेटवेळी ब्रेक घेऊन ट्रेनरची मदत घेतली. याआधी अमेरिकन ओपनमध्ये गतविजेत्या नोवाक जोकोविचलासुद्धा दुखापतीनं बाहेर पडावं लागलं.

फेडररनं पहिल्या सेटमध्ये 6-3 ने आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या सेटमध्ये दिमित्रोव्हनं कडवी लढत दिली. या सेटमध्ये फेडररच्या चुकांचा लाभ उठवत दिमित्रोव्हनं बाजी मारली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या सेटमध्ये फेडररनं आघाडी घेतली.

28 वर्षीय दिमित्रोव्हनं 3 तास 12 मिनिटं चाललेल्या या लढतीत फेडररला पुन्हा पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. त्यानं शेवटचे दोन सेट जिंकून सेमीफायनलमध्ये धडक मारली. दिमित्रोव्हनं पहिल्यांदा फेडररचा पराभव केला.

Loading...

दिमित्रोव्ह जागतिक क्रमवारीत 78 व्या स्थानी आहे. गेल्या 11 वर्षांत कोणत्याही ग्रँडस्लॅमच्या सेमीफायनलमध्ये पोहचणारा कमी रँकिंगचा खेळाडू आहे. याआधी 2008 मध्ये 94 व्या रँकिंगवर असलेल्या जर्मनीचा रेनर शूटलर विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये पोहचला होता.

VIDEO: शिल्पा शेट्टीच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन, ढोल-ताशाच्या तालावर धरला ठेका

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: us open
First Published: Sep 4, 2019 12:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...