US OPEN : भारताच्या नवख्या खेळाडूची फेडररला कडवी झुंज, पराभवानंतरही जिंकलं मन!

US OPEN : भारताच्या नवख्या खेळाडूची फेडररला कडवी झुंज, पराभवानंतरही जिंकलं मन!

भारताच्या सुमित नागलला टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररकडून पराभव पत्करावा लागला.

  • Share this:

वॉशिंग्टन, 27 ऑगस्ट : 2019 या वर्षातील शेवटची ग्रँड स्लॅम स्पर्धा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलनं रॉजर फेडररला कडवी झुंज दिली. टेनिसच्या जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या रॉजर फेडररला पहिल्या सेटमध्ये मागे टाकून सुमितनं धक्का दिला. पण उर्वरित सेट फेडररने जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला. पुरुष एकेरीमध्ये सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा विक्रम फेडररच्या नावावर आहे.

पहिल्या फेरीत जबरदस्त सुरुवात केल्यानंतर सुमितनं त्यानंतरचे तीन सेट गमावले. फेडररनं 4-6, 6-1, 6-2, 6-4 अशा फरकानं सुमितचा पराभव केला. पहिला आणि शेवटचा सेट फेडररला सुमितनं चांगलीच झुंज दिली.

सुमित नागलनं पहिल्या सेटमध्ये 6-4 अशा फरकानं फेडररवर मात केली. मात्र, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये फेडररनं एकतर्फी वर्चस्व गाजवलं. चौथ्या सेटमध्ये सुमित नागलनं कडवी झुंज दिली. फेडररनं चौथा सेट जिंकून पुढच्या फेरीत प्रवेश केला.

2015 च्या ज्युनिअर विम्बल्डन ग्रँड स्लॅम स्पर्धेत सुमित नागलनं विजेतेपद पटकावलं होतं. अशी कामगिरी करणारा तो सहावा भारतीय ठरला होता. हरियाणातील झज्जरमध्ये जन्मलेला सुमित नागल दिल्लीत राहतो.

SPECIAL REPORT: दोन जिल्हे आणि तीन नेते... आघाडीला बसणार मोठा धक्का

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 10:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading