US Open Final: 22 वर्षीय नाओमी दुसऱ्यांदा झाली युएस चॅम्पियन, बक्षीस रक्कम म्हणून मिळाले 22 कोटी

US Open Final: 22 वर्षीय नाओमी दुसऱ्यांदा झाली युएस चॅम्पियन, बक्षीस रक्कम म्हणून मिळाले 22 कोटी

1994नंतर पहिल्यांदा कोणत्या तरी महिला खेळाडूनं पहिला सेट गमावल्यानंतर अमेरिकन ओपन ही स्पर्धा जिंकली आहे.

  • Share this:

न्यूयॉर्क, 13 सप्टेंबर : जपानची 22 वर्षीय नाओमी ओसाकानं (Naomi Osaka) दुसऱ्यांदा अमेरिकन ओपन (US Open) स्पर्धा जिंकण्याची कामगिरी केली आहे. फायनलमध्ये ओसाकानं बेलारूसच्या विक्टोरिया अजारेंकाला (Victoria Azarenka) हरवले. पहिला सेट गमावल्यानंतर नाओमीनं जबदरस्त कमबॅक करत सलग दोन सेट जिंकले. नाओमीने अजारेंकाला 1-6, 6-3, 6-3 ने हरवले.

अमेरिकन ओपनचा महिला एकेरी फायनल सामना युएसटीए बिली जींस किंग नॅशनल टेनिस सेंटर येथे खेळवला गेला. केवळ 22 वर्ष वय असलेल्या नाओमीनं जिंकलेली ही तिसरी ग्रॅंडस्लॅम स्पर्धा आहे. याआधी तिने 2018 अमेरिकन ओपन आणि 2019मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा आपल्या नावावर केली होती. बक्षीस रक्कम म्हणून नाओमी 22 कोटी मिळाले.

तर, विक्टोरिया अजारेंकाला तिसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अजारेंकानं 2012 आणि 2013 अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात पोहचली होती. दोन्ही वेळा अजारेंकाला सेरेन विलियम्सने हरवले.

1994नंतर पहिल्यांदा कोणत्या तरी महिला खेळाडूनं पहिला सेट गमावल्यानंतर अमेरिकन ओपन ही स्पर्धा जिंकली आहे. याआधी सेमीफायनलमध्ये नाओमीने अमेरिकेच्या जेनिफर ब्रॅंडीला हरवत फायनलमध्ये आपली जागा मिळवली होती. ओसाकाने जेनिफरला 7-6(1), 3-6, 6-3 नमवत फायनलमध्ये प्रवेश केला होता. सामन्यानंतर बोलताना ओसाकानं आपल्या विजयाचे श्रेय आई-वडिलांना दिले.

Published by: Priyanka Gawde
First published: September 13, 2020, 8:47 AM IST
Tags: us open

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading