राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन, 19 व्या ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव

पहिलंच ग्रँड स्लॅम खेळत असलेल्या मेदवेदेवने अंतिम सामन्यात विजयासाठी राफेल नदालला चांगलाच संघर्ष करायला लावला.

News18 Lokmat | Updated On: Sep 9, 2019 08:39 AM IST

राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन, 19 व्या ग्रँड स्लॅमवर कोरलं नाव

मुंबई, 9 सप्टेंबर : स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल (Rafael Nadal)याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत 'अमेरिकन ओपन' (US Open 2019) स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या दानिल मेदवेदेवला पराभूत केलं. जवळपास पाच तास चाललेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवचा 7-5, 6-3, 5-7, 4-6, 6-4 असा पराभव केला.

अंतिम सामन्यात विजयासाठी राफेल नदालला पहिलंच ग्रँड स्लॅम खेळत असलेल्या मेदवेदेवने चांगलाच संघर्ष करायला लावला. मात्र नदालने आपल्या अनुभवाचा फायदा घेत प्रतिस्पर्धाला धूळ चारली.

अमेरिकन ओपन स्पर्धेतील नदालचं हे चौथं जेतेपद आहे. याआधी 2010, 2013, 2017 मध्ये तो अमेरिकन ओपनचा चॅम्पियन ठरला होता.

Loading...

फेडरचा रेकॉर्ड तोडण्यापासून एक पाऊल दूर

टेनिस विश्वात राफेल नदाल आणि रॉजर फेडरर हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जाता. अलिकडच्या काळात नदाल हा फेडररवर वरचढ ठरल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता नदाल फेडररच्या आणखी एका विक्रमाशी बरोबरी करण्याच्या उंबरठ्यावर आहे. रॉजर फेडररने 20 ग्रँड स्लॅम सिंगल्स जिंकत टेनिस विश्वावर राज्य केलं आहे. त्यामुळे फेडररच्या या विश्वविक्रमाशी बरोबरी करण्यापासून एक पाऊल दूर असलेला नदाल ही किमया करणार का, याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

VIDEO : प्रकाश आंबेडकरांबद्दल वापरला अपशब्द, वाहन निरीक्षकाला कार्यालयात घुसून मारलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 9, 2019 08:39 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...