US Open : गतविजेत्यानं अर्ध्यातच सोडलं मैदान, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

US Open : गतविजेत्यानं अर्ध्यातच सोडलं मैदान, स्पर्धेतील आव्हान संपुष्टात

प्रतिस्पर्धी खेळाडूनं पहिले दोन सेट जिंकले होते आणि गतविजेत्यानं सामना अर्धवट सोडला यामुळं त्याचं आव्हान संपुष्टात आलं.

  • Share this:

न्यूयॉर्क, 02 सप्टेंबर : जगातील नंबर एकचा टेनिसपटू आणि अमेरिकन खुली टेनिसचा गतविजेता नोवाक जोकोविचचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धेत चौथ्या फेरीत त्याची लढत स्वित्झर्लंडच्या स्टान वावरिंका याच्याशी होती. दोघांमध्ये जोरदार लढत सुरू असताना जोकोविचनं सामना अर्ध्यातच सोडला. खांद्याच्या दुखापतीचा त्रास असह्य झाल्यानं जोकोविचने पुढं खेळणं थांबवलं.

दुसरा सेट गमावल्यानंतर जोकोविचने वैद्यकीय मदत मागितली होती. फिजिओंनी तपासणी केल्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला होता. मात्र खांद्याला त्रास जाणवू लागल्यानं जोकोविचनं स्पर्धेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. दुखापत असतानाही त्यानं दोन सेटपर्यंत मैदानावर लढत दिली. यात वावरिंका 6-4, 7-5 असा आघाडीवर होता. विजयासाठी त्याला फक्त एक सेट जिंकण्याची गरज होती. तिसऱ्या सेटमध्येसुद्धा त्यानं आघाडी घेतली होती.

जोकोविचनं मैदान सोडल्यानं वावरिंका पुढच्या फेरीत पोहचला आहे. स्पर्धेच्या सुरुवातीलाच जोकोविचला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. अर्जेंटिनाच्या हुआन लॉनेडरोविरुद्धच्या सामन्यातही तो खांद्याच्या दुखापतीनं त्रस्त होता. त्यानंतरही त्यानं जबरदस्त पुनरागमन केलं होतं.

शनिवारी जोकोविचनं अमेरिकनं खेळाडू डेनिस कुडला याला सरळ सेटमध्ये पराभूत करून अंतिम 16 मध्ये प्रवेश मिळवला होता. जोकोविचनं लढत अर्ध्यात सोडल्यानंतर आपण दुखापतीबद्दल काही बोलणार नस्लयाचं सांगितलं. तर वावरिंगका म्हणाला की, जोकोविच एक चांगला दोस्त आहे. अशा पद्धतीनं सामना कधीच संपवण्याची इच्छा नाही.

VIDEO: डान्सचा जलवा चाहत्यांच्या शिट्ट्या; हिला म्हणतात पाकची सपना चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: us open
First Published: Sep 2, 2019 02:24 PM IST

ताज्या बातम्या