मुंबई, 03 मे : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या एस.श्रीशांतवर भारतीय संघाचे माजी सहायक प्रशिक्षक पॅडी अपटन यांनी आपल्या आत्मचरित्रात गंभीर आरोप केले आहेत.
अपटन यांनी आपल्या Barefoot Coach या पुस्तकात एक धक्कादायक प्रसंग विशद केला आहे. यात त्यांनी श्रीशांतनं माजी क्रिकेटपटू आणि भारतीय युवा संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड यालाच शिव्या घातल्या, असा आरोप केला आहे.२०१३ साली स्पॉट फिक्सींग प्रकरणी राजस्थान रॉयल्स संघाचे खेळाडू श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंदेला यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अपटन यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या दाव्यानुसार या खेळाडूंना अटक करण्यात आल्यानंतर त्यांची संघातून लगेचच हकालपट्टी करण्यात आली होती. यातच श्रीशांतचा स्वभाव विक्षिप्त असल्यामुळं प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. या दरम्यान श्रीशांतनं राहुलला शिवीगाळ केली होती, असा आरोप अपटन यांनी केला आहे. दरम्यान श्रीशांतनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.
इंडियन एक्सप्रेसशी बोलताना श्रीशांतनं, ''अपटन खोटारडा असून मी कधीच द्रविडला शिवीगाळ केली नाही. मी नेहमीच माझ्या सहकाऱ्यांचा आधार केला आहे''.
अपटन यांनी आपल्या पुस्तकात श्रीशांत आणि 2013 साली झालेल्या स्पॉट फिक्सिंग या प्रकरणी भाष्य केलं आहे. अपटननं आपल्या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार, मुंबईविरुद्ध झालेल्या सामन्यात श्रीशांत आणि चंदेला या दोन्ही खेळाडूंना संघाबाहेर बसवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी अंकितची फिक्सिंगकरिता निवड केली. दिल्ली पोलिसांनी आपल्या 6 हजार पानांच्या चार्जशीटमध्ये चंदेला अंकित फिक्सिंग कशी करावी, याबाबत माहिती देत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
दरम्यान बीसीसीआयनं या तीनही खेळाडूंवर क्रिकेटबंदी लादली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वी श्रीशांतवरची बंदी हटवण्यात आली होती. दरम्यान श्रीशांतनं मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. श्रीशांतसध्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी धडपडत आहे. त्यानं नुकतेच बिग बॉस हा शोमध्ये भाग घेतला होता.
सोलापुरात खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी, अंगावर शहारे आणणारा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ipl 2019, Rahul dravid, S sreesanth, Sreesanth match fixing