मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

धक्कादायक! सेहवागसोबत ओपनिंग केलेल्या भारतीय खेळाडूने केले मानसिक शोषणाचे आरोप

धक्कादायक! सेहवागसोबत ओपनिंग केलेल्या भारतीय खेळाडूने केले मानसिक शोषणाचे आरोप

सेहवागसोबत खेळलेल्या क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

सेहवागसोबत खेळलेल्या क्रिकेटपटूचे गंभीर आरोप

उनमुक्त चंद (Unmukt Chand) याने निवृत्तीनंतर दिल्ली क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आरोप केले आहेत. भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर उनमुक्त चंद अमेरिकेतल्या लीगमध्ये खेळत आहे.

  • Published by:  Shreyas
मुंबई, 21 ऑगस्ट : एक क्रिकेटपटू ज्याला देशाचा पुढचा सुपरस्टार म्हणून पाहिलं जायचं. 2012 साली त्याच्या नेतृत्वात भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला. आता याच खेळाडूने फक्त 28 व्या वर्षी भारतीय क्रिकेटला अलविदा केला. आपण बोलत आहोत उनमुक्त चंदविषयी (Unmukt Chand). उनमुक्तने 13 ऑगस्टला भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता उनमुक्त अमेरिकेमध्ये क्रिकेट खेळणार आहे. भारतीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर उनमुक्त चंदने दिल्ली क्रिकेट असोसिएशनवर गंभीर आरोप केले आहेत. स्पोर्ट्सकीडाला दिलेल्या मुलाखतीमध्ये उनमुक्त म्हणाला, 'चार महिने आधी मी भारतीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा विचारही केला नव्हता. दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) घाणेरड्या राजकारणामुळे मी अमेरिकेत जायचा विचार केला आणि निवृत्तीचं पाऊल उचललं.' 'मागची काही वर्ष माझ्यासाठी खूप कठीण होती. मागच्या मोसमात दिल्लीकडून एकही मॅच खेळण्याची संधी मला मिळाली नाही. पुन्हा तीच सत्ता येत होती, त्यामुळे मला खेळण्याची संधी मिळेल का नाही, हेदेखील माहिती नव्हतं. माझ्यासाठी बेंचवर बसून राहणं मानसिक शोषण होतं, कारण ज्यांना खेळण्याची संधी मिळत होती, त्यांना मी माझ्या क्लब टीममध्येही सामील करणार नाही,' असं खळबळजनक विधान उनमुक्त चंद याने केलं आहे. 'याबाबत आणखी विचार करून मी माझा वेळ फुकट घालवणार नाही, त्यामुळे मी अमेरिकेत जायचा निर्णय घेतला. माझ्या करियरची काही वर्ष शिल्लक आहेत आणि मला चांगलं क्रिकेट खेळायचं आहे,' अशी प्रतिक्रिया उनमुक्त चंदने दिली. उनमुक्त चंद दिल्ली आणि उत्तराखंडकडून रणजी ट्रॉफी खेळला. 67 प्रथम श्रेणी मॅचमध्ये 8 शतकांच्या मदतीने त्याने 3,379 रन केले. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याला 41.33 च्या सरासरीने 4,505 रन करता आले. टी-20 क्रिकेटमध्ये उनमुक्त चंदने 3 शतकं ठोकली आहेत. उनमुक्त चंद आयपीएलमध्ये दिल्ली डेयरडेव्हिल्स (Delhi Dare Devils) आणि मुंबई इंडियन्ससोबत (Mumbai Indians) होता. दिल्लीकडून त्याने सेहवागसोबत (Virender Sehwag) ओपनिंग केली, तर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात तो मुंबईकडूनही खेळला. पण आयपीएलमध्ये त्याला यश मिळालं नाही. आयपीएलमध्ये त्याने 15 च्या सरासरीने 300 रन केले.
First published:

Tags: Cricket

पुढील बातम्या