'आई-काकांना कोरोना, रेमेडिसिवरची लगेच गरज', वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचं आवाहन

'आई-काकांना कोरोना, रेमेडिसिवरची लगेच गरज', वर्ल्ड कप विजेत्या कॅप्टनचं आवाहन

टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याची आई आणि काकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या आईला आणि काकांना रेमेडिसिवरची (Remdesevir) तात्काळ गरज आहे.

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : टीम इंडियाला अंडर-19 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याची आई आणि काकांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या आईला आणि काकांना रेमेडिसिवरची (Remdesevir) तात्काळ गरज आहे, याबाबत कोणाला माहिती असेल तर लगेच सांगा, असं आवाहन उन्मुक्त चंद याने ट्वीट करून केलं आहे. उन्मुक्तची आई आणि काका दिल्लीच्या भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.

उन्मुक्त चंदच्या नेतृत्वात भारताने 2012 साली अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. यानंतर उन्मुक्तही विराट कोहलीप्रमाणेच भारताकडून खेळेल आणि मोठं नाव कमवेल अशी सगळ्यांची अपेक्षा होती, पण त्याला म्हणावं तसं यश मिळालं नाही. स्थानिक क्रिकेटमध्येही त्याने चांगली सुरुवात केली, पण त्याला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. यानंतर उन्मुक्त चंद काही क्रिकेट स्पर्धांमध्ये कॉमेंट्री करतानाही दिसला.

अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये उन्मुक्त चंदने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार शतक झळकावलं, यानंतर तो भारताच्या ए टीमचा कर्णधार होता, पण 2016 सालापासून पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उन्मुक्त चंदची कारकिर्द कोसळायला सुरुवात झाली. दिल्लीच्या वनडे टीममधून चंद बाहेर झाला, त्याला आयपीएलमध्येही कोणत्या टीमने विकत घेतलं नाही.

Published by: Shreyas
First published: April 17, 2021, 4:49 PM IST
Tags:

ताज्या बातम्या