भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधारानं सोडला स्वत:चा संघ, निर्णयावेळी झाला भावुक

भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधारानं सोडला स्वत:चा संघ, निर्णयावेळी झाला भावुक

वर्ल्ड कप जिंकून 7 वर्ष झाली असून विराटशी कोणतीही तुलना नाही. या काळात खूप काही बदललं असं म्हणत आता पुढे जाण्याची वेळ असल्याचं उन्मुक्त चंदनं म्हटलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : भारताचा क्रिकेटपटू उन्मुक्त चंद घरेलू क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करत असूनही त्याला राष्ट्रीय संघात संधी मिळालेली नाही. भारताला अंडर 19 मध्ये वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर उन्मुक्त चंदसुद्धा विराट आणि मोहम्मद कैफप्रमाणे क्रिकेट कारकिर्द गाजवेल. त्याची घरेलू क्रिकेटमध्ये चांगली सुरुवात झाली मात्र भारतीय संघात मात्र स्थान मिळवता आलं नाही.

हनुमा विहारी, संदीप शर्मा या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. उन्मुक्त चंद मात्र अद्याप घरेलू क्रिकेटमध्येच आहे. त्यानं ट्विटरवरून संघ सोडत असल्याचं सांगितलं आहे. चांगल्या कामगिरीनंतरही अंडर 19 वर्ल्ड कप झाल्यावर त्याला म्हणावी तशी संधी मिळाली नाही. उन्मुक्त चंद म्हणतो की माझा प्रवास विराट किंवा पृथ्वी शॉ यांच्यापेक्षा वेगळा असेल.

टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीतल त्यानं सांगितलं की, आम्ही अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून दिले त्याला 7 वर्ष झाली आहे. या काळात खूप काही बदललं आहे. माझ्य़ासाठी तो अविस्मरणीय क्षण आहे. मोठ्या स्पर्धेत मला भारताचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आणि विजेतेपद मिळवू शकलो हे माठं भाग्य आहे.

आता पुढे जाण्याची वेळ आहे. देशासाठी खेळण्याची इच्छा आहे. सध्या माझं वय 26 असून मला पूर्ण विश्वास आहे की मी भारतासाठी खेळेन. हेच माझं शेवटचं स्वप्न आहे. अनेकदा स्वप्न उशिरा पूर्ण होतं तर कधी लवकर पुर्ण होतं असं उन्मुक्त चंदनं म्हटलं आहे.

माझ्या क्रिकेट कारकिर्दीची तुलना कोणाशीही करू इच्छित नाही. विराट कोहली, पृथ्वी शॉ यांना लवकर संधी मिळाली. पण माझा प्रवास वेगळा आहे. मी स्वत:चा रस्ता स्वत: तयार करतो. भारताकडून खेळण्यासाठी मी कष्ट करत आहे. आता दिल्लीचा संघ सोडून आपण उत्तराखंडकडून खेळणार असल्याचं उन्मुक्तनं ट्विटरवरून सांगितलं.

दिल्लीचा संघ सोडणं कठीण आहे पण पुढं जावंच लागेल असं उन्मुक्तनं ट्विटरवर म्हटलं आहे. दिल्लीने त्याला ना हरकत प्रमाणपत्र दिलं आहे. दिल्लीने माझ्या क्रिकेटसाठी खूप मदर केली. आता उत्तराखंडकडून खेळण्याची संधी मिळत आहे असंही उन्मुक्त चंदने म्हटलं आहे. तो आता उत्तराखंडच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

First published: September 4, 2019, 1:20 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading