वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ज्युनिअर कोहलीनं सांगितला 3 वर्ष बेरोजगारीचा अनुभव

वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या ज्युनिअर कोहलीनं सांगितला 3 वर्ष बेरोजगारीचा अनुभव

लहान असताना स्वप्न पाहिलेलं पण जेव्हा बेरोजगारी अनुभवली तेव्हा रस्त्यावर आल्यासारखं वाटलं असं भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या या कर्णधारानं म्हटलं.

  • Share this:

दिल्ली, 14 सप्टेंबर : भारताला 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंदला टीम इंडियाचं भविष्य मानलं जातं होतं. मात्र गेल्या दोन हंगामात त्याला दिल्लीच्या रणजी संघातही जागा मिळू शकली नाही. अशा स्थितीत कारकिर्द मार्गावर आणण्यासाठी त्यानं उत्तराखंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला आहे.

रणजीच्या हंगामात 2019-20 मध्ये उत्तराखंडचे नेतृत्व उन्मुक्त चंद करणार आहे. त्याआधी पहिल्यांदा तीन वर्ष त्याला भारतीय क्रिकेट संघाचा दावेदार मानलं जात होतं. मात्र खराब कामगिरीमुळं त्याचं हे स्वप्न भंगलं. आयपीएलच्या तीनही हंगामात त्याला कोणत्याही संघाने घेतलं नाही. तसेच दिल्लीकडूनसुद्धा उन्मुक्तला प्रथम श्रेणीचा सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

उन्मुक्तच्या नेतृत्वाखाली भारतानं 2012 मध्ये अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. अंतिम सामन्यात त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी केली होती. त्याआधी 2010-11 च्या हंगामात रणजीत गोलंदाजांना पोषक खेळपट्टीवर 151 धावांची खेळी केली होती. त्याला ज्यूनिअर विराट कोहली म्हणून ओळखलं जात होतं. विशेष म्हणजे दोघेही दिल्लीकडून खेळत होते. तसेच दोघांनीही अंडर 19 वर्ल्ड कप जिंकला होता. मात्र, उन्मुक्त चंदच्या खराब कामगिरीने त्याला फटका बसला.

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यानं सांगितलं की, वाईट काळ एका आठवड्यातच आला. 2017 मध्ये पहिल्यांदा रणजी संघातून काढलं. त्यानंतर आयपीएलमध्ये कोणत्याच संघाने घेतलं नाही. तेव्हा आयुष्यच संपल्यासारखं वाटलं. त्याआधी कधीही वाटलं नाही की मी दिल्लीकडून खेळण्याच्या पात्रतेचा आहे. टीम इंडियात दावेदारी दाखल करताना इंडिया ए टीमचा कर्णधार होतो. दिग्गज खेळाडूंनाही खराब फॉर्मची भीती असते.

उन्मुक्त म्हणाला की, मी लहान असताना सर्व प्रकारच्या भावनांचा अनुभव घ्यायचा असं म्हणत होतो. मात्र, आता समजतंय की जे मागायचं ते समजून मागा. मला अपयश आलं तेव्हा रस्त्यावर आल्यासारखं वाटलं.

SPECIAL REPORT: राजे मंडळींनी राष्ट्रवादीची साथ सोडली; शरद पवार एकटे पडले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2019 03:34 PM IST

ताज्या बातम्या