'अनलकी शॉ' आर्चरचे ट्वीट, पृथ्वीच्या बंदीवर 4 वर्षांपूर्वीच केलं होतं भाकीत?

'अनलकी शॉ' आर्चरचे ट्वीट, पृथ्वीच्या बंदीवर 4 वर्षांपूर्वीच केलं होतं भाकीत?

भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉवर बीसीसीआय़ने 8 महिन्यांची बंदी घातली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जुलै : ICC Cricket World Cup स्पर्धेदरम्यान इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने केलेले ट्वीट व्हायरल झाले होते. त्याने चार वर्षांपूर्वी केलेली ट्वीट स्पर्धेवेळी चर्चेत आली होती. आता वर्ल्ड कप संपला तरीही त्याचे ट्वीट व्हायरल होत आहे. 'अनलकी शॉ' असं ट्वीट आर्चरनं 2015 मध्ये केलं होतं. मंगळवारी भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉला उत्तेजक द्रव्य सेवन केल्याप्रकरणी बीसीसीआयने 8 महिन्याची बंदी घातली आहे. यावेळीच आर्चरच्या या ट्विटवर मजेशीर चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

पृथ्वी शॉने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीवेळी वाडाने बंदी घातलेल्या द्रव्याचं सेवन केल्याचं आढळल्यानं त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शॉवर 8 महिन्यांची बंदी घातली असून त्याला 15 नोव्हेंबरपर्यंत खेळता येणार नाही. दरम्यान, आर्चरच्या 'अनलकी शॉ' ट्वीटने धुमाकूळ घातला आहे.

आर्चरचे हे ट्वीट म्हणजे भाकित आहे असे समजून चाहत्यांनी ते शेअर केलं आहे. वर्ल्ड कपवेळीसुद्धा त्याची ट्वीट आयसीसीनेसुद्धा शेअर केले होते. आता भारतीय चाहत्यांनी आर्चरला भारतात येण्यास सांगितलं आहे. भविष्य बघायचे काम कर त्याला खूप मागणी आहे असं एका युजरने म्हटलं आहे.

खरंतर जोफ्रा आर्चरचे ट्वीट पृथ्वी शॉबद्दल नव्हते. त्याने इंग्लिश फूटबॉलपटू ल्यूक शॉ याच्यासाठी केलं होतं. त्यावेळी चॅम्पियन्स लीगमध्ये एका सामन्यात ल्यूकला दुखापत झाली होती. ल्यूक शॉसाठी केलेलं ट्वीट पृथ्वी शॉच्या नावाला जोडून शेअर केलं जात असून त्याची जोरदार चर्चा होत आहे.

शोध प्रशिक्षकाचा : गॅरी कर्स्टन यांच्यासह 3 नावं चर्चेत!

कपिल देव भारतीय क्रिकेट असोसिएशनच्या समितीचे सदस्य आहेत. अंशुमन गायकवाड यांच्यासोबत टीव्हीवर विशेषज्ञ म्हणून काम पाहतात. याशिवाय गायकवाड बीसीसीआय़च्या मेंबरशी निगडीत समितीचा भाग आहेत. तर शांता रंगास्वामी आयसीएच्या संचालक आहेत.

आफ्रिदी म्हणतो,'पागल है? गेंदबाजी कौन करेगा?'; पाहा VIDEO

सोलापूरमध्ये बँकेचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading