U19 World Cup: बांगलादेशची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, भारताविरुद्ध होणार महामुकाबला

U19 World Cup: बांगलादेशची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, भारताविरुद्ध होणार महामुकाबला

बांगलादेशच्या संघाने इतिहासात पहिल्यांदाच अंडर 19 वर्ल्ड कप फायनल गाठण्याची किमया केली आहे.

  • Share this:

पोचेफ्स्ट्रूम, 6 फेब्रुवारी : न्यूझीलंडच्या संघाला पराभूत करत बांगलादेशने पहिल्यांदाच अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये (U 19 world cup 2020) धडक मारली आहे. त्यामुळे वर्ल्डकप ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी भारत विरुद्ध बांगलादेश असा महामुकाबला होणार आहे. सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडवर विजय मिळवत बांगलादेशच्या संघाने इतिहासात पहिल्यांदाच अंडर 19 वर्ल्ड कप फायनल गाठण्याची किमया केली आहे.

फायनलमध्ये दाखल झालेल्या बांगलादेशच्या संघासमोर बलाढ्य भारतीय संघाचं आव्हान असणार आहे. भारताने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानचा 10 विकेट्सने धुव्वा उडवला होता.

भारत Vs पाक सेमीफायनलमध्ये नेमकं काय झालं?

सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा 'यशस्वी' पाठलाग करत भारताने वर्ल्डकप फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताचा सलामीवर यशस्वी जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर भारताने पाकिस्तानवर (ind vs pak) 10 विकेट्सने विजय मिळवला.

पाकिस्तानने दिलेल्या 173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वालच्या शतकाच्या आणि दिव्यांश सक्सेनाच्या अर्धशतकाच्या जोरावर 10 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. जयस्वाल आणि दिव्यांश सक्सेना यांनी पाकच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. दोघांनी सावधपणे खेळ करत भारताचा विजय साजरा केला. जयस्वालने नाबाद 105 तर दिव्यांशने नाबाद 59 धावा केल्या.

First published: February 6, 2020, 9:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या