Home /News /sport /

U19 WC:पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 115 धावांनी विजय, तर कांगारूंनी डी गटातील आपले वर्चस्व कायम राखले

U19 WC:पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा 115 धावांनी विजय, तर कांगारूंनी डी गटातील आपले वर्चस्व कायम राखले

 हसीबुल्लाह खान

हसीबुल्लाह खान

अंडर 19 वर्ल्‍ड कप 2022(Under 19 World Cup 2022)मध्ये पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे. सी गटातील सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेवर 115 धावांनी विजय मिळवला (Pakistan vs zimbabwe).

    नवी दिल्ली, 18 जानेवारी: अंडर 19 वर्ल्‍ड कप 2022(Under 19 World Cup 2022)मध्ये पाकिस्तानने विजयी सुरुवात केली आहे. सी गटातील सामन्यात पाकिस्तानने झिम्बाब्वेवर 115 धावांनी विजय मिळवला (Pakistan vs zimbabwe). त्याचबरोबर  डी गटातील सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढय़ संघाचा 4 विकेट राखून पराभव करत सलग दुसरा विजय नोंदवत विजयी वाटचाल कायम राखली. दिवसाच्या आणखी एका सामन्यात स्कॉटलंडला डी गटात वेस्ट इंडिजकडून 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. कॅरेबियन संघाचा दोन सामन्यातील हा पहिला विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने निर्धारित षटकात 315 धावा केल्या. यष्टिरक्षक फलंदाज हसिबुल्ला खानने 135 धावांची शानदार खेळी केली. हसीबुल्लाहने आपल्या झंझावाती खेळीत 10 चौकार आणि 4 षटकार मारले. त्याच्याशिवाय इरफान खाननेही 75 धावांची आक्रमक खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघ विरोधी संघाला आव्हानात्मक लक्ष्य देऊ शकला. पाकिस्तानी फलंदाजांनंतर गोलंदाजांनी आपली ताकद दाखवत झिम्बाब्वेला 200 धावांत गुंडाळले. अवैस अलीने 56 धावांत 6 बळी घेतले.

    दुनिथ वेलालगेनचा भेदक मारा

    श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा पराभव करत डी गटातील आपले वर्चस्व कायम राखले. श्रीलंकेचा हा सलग दुसरा विजय असून ते त्यांच्या गटात 4 गुणांसह अव्वल स्थानावर आहेत, तर ऑस्ट्रेलिया 2 विजयांतून 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या घातक गोलंदाजीसमोर ऑस्ट्रेलियन संघ केवळ 175 धावाच करू शकला. ड्युनिथ वेलेझने २८ धावांत ५ बळी घेतले. श्रीलंकेने 176 धावांचे लक्ष्य 78 चेंडूत 6 गडी गमावून पूर्ण केले. यजमान वेस्ट इंडिजचा पहिला विजय ड गटातील आणखी एका सामन्यात यजमान वेस्ट इंडिजला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यात यश आले. वेस्ट इंडिजने स्कॉटलंडवर 7 विकेट्सने मात केली. या विजयासह यजमान आपल्या गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कॅरेबियन फलंदाजांनी स्कॉटलंडला 95 धावांत गुंडाळले. यानंतर यजमानांनी 3 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावांचे लक्ष्य गाठले.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    पुढील बातम्या