U-19 World Cup: VIDEO : खरा जेंटलमन गेम! प्रतिस्पर्धी संघाने जखमी फलंदाजाला खांद्यावर उचललं आणि...

U-19 World Cup: VIDEO : खरा जेंटलमन गेम! प्रतिस्पर्धी संघाने जखमी फलंदाजाला खांद्यावर उचललं आणि...

क्रिकेट हा खेळ जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडच्या काळात याच खेळाला स्लेजिंगमुळे गालबोट लागले.

  • Share this:

केप टाऊन, 30 जानेवारी : क्रिकेट हा खेळ जेंटलमन गेम म्हणून ओळखला जातो. मात्र अलीकडच्या काळात याच खेळाला स्लेजिंगमुळे गालबोट लागले. मात्र असे असले तरी आजही न्यूझीलंडचा संघ हा खेळ भावना जपणारा संघ म्हणून ओळखला जातो. एकीकडे सिनियर पुरुष संघ आपल्या खेळीनं चाहत्यांचे मन जिंकत असतात तर, दुसरीकडे न्यूझीलंड अंडर-19 संघाने असे काही केले की सर्वच त्यांचे कौतुक करत आहेत.

दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये सध्या सर्व संघ उपांत्य फेरीची तयारी करत आहेत. यात न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरी सामन्यात किवींनी सर्वांचे मन जिंकले.

वाचा-IPL खेळण्यासाठी उतावळा झाला पाक खेळाडू, 12 वर्षांपूर्वी सचिनला केलं होतं बाद

नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात वेस्ट इंडिजच्या कर्क मॅकेन्झीने 99 धावा केल्या. पायाला दुखापत झाल्यामुळं रिटायर्ड हर्ट होऊन तो मैदाना बाहेर गेला. मात्र शेवटच्या षटकांमध्ये तो पुन्ह मैदानात परतला. वेस्ट इंडिजकडून बाद करण्यात आलेला तो शेवटचा फलंदाज होता. सामना संपल्यानंतर त्याची कर्कची अवस्था एवढी बिकट होती की त्याला उभे राहणेही शक्य नव्हते. त्यावेळी किवी संघातील दोन खेळाडूंनी कर्कला चक्क आपल्या खांद्यावर उचलून मैदानातून बाहेर नेले.

वाचा-VIDEO : ...आणि रोहितने 'मराठमोळ्या’ स्टाईलमध्ये सांगितले सुपर ओव्हरचं सिक्रेट!

वाचा-सुपर ओव्हरमध्ये कोणाच्या चुकीमुळे घडला चमत्कार? रोहित शर्माने केला खुलासा

कर्कने 43व्या षटकात 103 चेंडूंत 99 धावांवर नाबाद असताना पायात क्रॅम्प आल्यामुळं त्याला मैदानाबाहेर जावे लागले. कर्कला क्रिस्चियन क्लार्कने बोल्ड केले. बाद झाल्यानंतर बाहेर जाताना त्याला चालताही येत नव्हते. तेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आपल्या खांद्यावर उचलून घेत याला मैदानाबाहेर नेले. त्याचा व्हिडिओ आयसीसीच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. मात्र वेस्ट इंडिजने दिलेले 239 धावांचे आव्हान किवींना पार करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

First published: January 30, 2020, 11:41 AM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या